19 April 2025 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Stock in Focus | या सरकारी बँक FD चं व्याज एक आकड्यात, तर त्याच सरकारी बँकेच्या शेअरचा परतावा शेकडयात, खरेदीचा सल्ला

Stock in Focus

Stock in Focus | मागील काही महिन्यांपासून सरकारी बँकांच्या कामगिरी, व्यवसाय आणि मालमत्ता गुणवत्तेत कमालीची सुधारणा पाहायला मिळत आहे. म्हणून गुंतवणूकदारांनी सरकारी बँकांच्या शेअरवर अधिक विश्वास व्यक्त केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी आपल्या शेअरधारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.

असाच एक स्टॉक म्हणजे, पंजाब नॅशनल बँक. शेअर बाजारातील तज्ञांनी पंजाब नॅशनल बँक स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी पंजाब नॅशनल बँक स्टॉक 0.41 टक्के वाढीसह 74.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ब्रोकरेज फर्म शेअरखानने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात माहिती दिली आहे की, बँकेच्या मालमत्तेवरील आरओए सतत सुधारणा पाहायला मिळत आहे. आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये पंजाब नॅशनल बँकेचा आरओए 1 टक्के पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या बँकेची मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याने क्रेडिट खर्च सामान्य पातळीवर आहे. पंजाब नॅशनल बँकेचा निव्वळ एनपीए चालू आर्थिक वर्षात 1 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

तज्ज्ञांच्या अहवालानुसार, पीएनबी बँकेचा ताळेबंद मजबूत स्थितीत आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये बँकेच्या पत वाढीचे लक्ष्य 12-13 टक्के निश्चित करण्यात आले आहेत. कर्जाची निरोगी वाढ, स्थिर मार्जिन आणि नियंत्रित ऑपरेशनल खर्चामुळे पंजाब नॅशनल बँकेचा प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग प्रॉफिट मजबूत राहण्याची शक्यता आहे. बँकेच्या मालमत्तेत गुणवत्ता सुधारणा होत आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये बँकेने 22000 कोटी रुपये कर्जाची वसुली करणे अपेक्षित आहे, जी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 14570 कोटी रुपये वसुली झाली होती.

ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2023-24 आणि आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये RoA 0.5 टक्के ते 0.8 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील दोन आर्थिक वर्षांमध्ये बँकेच्या इक्विटीवर परतावा 7 टक्के आणि 11 टक्के मिळणे अपेक्षित आहे. या सर्व बाबीचा विचार करून ब्रोकरेज फर्मने पंजाब नॅशनल बँक स्टॉकवर 86 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यास त्यांना सध्याच्या किंमत पातळीच्या तुलनेत 15 टक्के नफा मिळू शकतो.

मागील एका आठवड्यात पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के आणि माहील सहा महिन्यांत 55 टक्के नफा कमावून दिला आहे.

2023 या वर्षात पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 31 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरची किंमत 82 टक्के वाढली आहे. या बँकेच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक पातळी किंमत 74.85 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 26 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Punjab National Bank Stock in Focus 16 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या