19 November 2024 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Quick Money Share | मस्तच! या शेअरने 11 दिवसात 166% परतावा दिला, वेगाने वाढणारा शेअर खरेदीसाठी झुंबड का होतेय?

Quick Money Making Share

Quick Money Share | SBEC शुगर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवडाभरापासून अपर सर्किटवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारात मागील 11 ट्रेडिंग सेशनपासून एक स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून देत आहे. मोदी उद्योग समूहाचा भाग असलेल्या SBEC शुगर कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक तेजी पाहायला मिळत आहे. एसबीईसी शुगर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आज सुरुवातीच्या काही तासात 10 टक्के अप्पर सर्किट स्पर्श केला होता. हा स्टॉक मागील काही आठडव्यापासून दररोज नवीन उच्चांक किंमत पातळी निर्माण करत आहे. सलग तेजीनंतर स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीने कंपनीकडून स्टॉक वाढी बद्दल स्पष्टीकरण मागितले होते, त्यावर एसबीईसी शुगर कंपनी उत्तर दिले की, आमच्याकडे स्टॉक मध्ये आलेल्या अचानक तेजीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)

11 दिवसात स्टॉकमध्ये 166 टक्के वाढ :
मागील 11 ट्रेडिंग सेशनमध्ये SBEC कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक कमाई करून दिली आहे. या दरम्यान SBEC शुगर कंपनीचे शेअर्स 23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र आता त्यात वाढ होऊन शेअर्स 61.10 रुपयांवर पोहचले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी अवघ्या 11 दिवसात 166 टक्के नफा कमावला आहे. म्हणजेच अवघ्या 11 दिवसांत गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये वाढून अडीच लाख झाले आहे. त्याच वेळी मागील पाच दिवसांत या स्टॉकची किंमत जवळपास 27.16 टक्के वधारली आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 24.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानुसार या महिन्यात आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सने केवळ 10 ट्रेडिंग सेशनमध्ये 148.98 टक्के नफा कमावून दिला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
एसबीईसी शुगर लिमिटेड कंपनी उमेश मोदी बिझनेस ग्रुपचा भाग आहे. मोदी उद्योग समूह आणि एसबीईसी सिस्टीम्स लिमिटेड कंपनी एसबीईसी शुगर कंपनीला साखर उत्पादनातील उच्च तंत्रज्ञान सेवा प्रदान करते. SBEC कंपनीची प्रमोटर कंपनी प्रोजेक्ट डिझाईन, अभियांत्रिकी सेवा आणि सुविधा, IT कन्सल्टिंग, या क्षेत्रात अग्रेसर मानली जाते. SBEC शुगर कंपनीने पश्चिम उत्तरप्रदेश राज्याच्या ऊस पट्ट्यात मध्यभागी आपले साखर उत्पादन केंद्र सुरू केले आहे, जिथे उच्च दर्जाची पांढरी क्रिस्टल साखर बनवली जाते. कंपनीच्या उत्तर प्रदेशातील उत्पादन केंद्राची क्षमता प्रतिवर्षी 60,000 टन साखर एवढी आहे, जी सध्या 120,000 टन प्रतिवर्षपर्यंत वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Making Share Of SBEC Sugar Limited share price return on investment on 15 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Making Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x