20 April 2025 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Quick Money Share | बँक FD वर 1 महिन्यात 90% व्याज देईल? पण हे शेअर्स 1 महिन्यात 90% पर्यंत परतावा देत आहेत

Quick Money Shares

Quick Money Share |  सध्या जगात अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील सर्व शेअर बाजारात नकारात्मक भावना पाहायला मिळत आहेत. यामुळेच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 980 अंकांनी पडला होता तर निफ्टी-50 मध्ये 320 अंकांची जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. आज मात्र हे दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना 3 कंपन्यांच्या शेअर्सवर याचा कोणताही परिणाम पाहायला मिळत नाही आहे. चला तर मग जाणून घेऊ या तीन जबरदस्त शेअरबद्दल.

भारत इम्युनोलॉजिकल अँड बायोलॉजिकल कॉर्पोरेशन लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 19.92 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. आज हा स्टॉक 9.92 टक्क्यांच्या वाढीसह 49.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या जबरदस्त बाऊन्सनंतर भारत इम्युनोलॉजिकल अँड बायोलॉजिकल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्या 49.30 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.

बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 20 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. आज हा स्टॉक 2.80 टक्क्यांच्या घसरणीसह 13896 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 14,296.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 30.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. तथापि 2022 या वर्षाच्या सुरुवातीला बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावणाऱ्या लोकांना 4.50 टक्के नफा मिळाला आहे.

Morepen Laboratories Ltd :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात ब्लड बाथ पाहायला मिळत होता, तर दुसरीकडे या फार्मा कंपनीच्या शेअर्सची किंमत गगन भरारी घेत होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.02 टक्क्यांच्या वाढीसह 43.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स 6.80 टक्क्यांच्या घसरणीवरसह 39.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात Morepen Lab कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares list trading on green signal check details on 26 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या