19 November 2024 8:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Quick Money Shares | पैसे छापत आहेत फक्त! 4 दिवसात या शेअर्सनी 52 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, खरेदी करणार असे स्टॉक?

Quick Money shares

Quick Money Shares | 11 नोव्हेंबर 2022 रोजी संपलेल्या सलग चौथ्या आठवड्यात शेअर बाजार हिरव्या निशाणीवर बंद झाला होता. सध्या शेअर बाजारात इतकी तेजी आहे की, आता बाजार वर्षभरापूर्वीच्या विक्रमी उच्चांकालाही स्पर्श करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कमी होणारी महागाई, यूएस फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदर वाढीची कमी शक्यता, अमेरिकन डॉलरचे अवमूल्यन आणि एफआयआय यांची वाढलेली खरेदी हे काही सकारात्मक घटक आहेत ज्यांनी भारतीय शेअर बाजाराला सपोर्ट केला आहे.

गेल्या आठवड्यात निफ्टी-50 मध्ये 200 अंकांची म्हणजेच जवळपास 1 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती आणि निफ्टी 18,350 अंकांवर ट्रेड करत होता. निफ्टी 19 ऑक्टोबर 2022 नंतर सध्या सर्वोच्च स्तरावर ट्रेड करत आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा, तंत्रज्ञान आणि मेटल कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी वाढल्यामुळे BSE सेन्सेक्स 62,000 अंकावर पोहचला आहे. सेन्सेक्स मध्ये 845 अंकांची वाढ झाली असून सध्या 61,795 अंकावर ट्रेड करत आहे. दुसरीकडे, निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक 1 टक्के घसरला आहे, तर निफ्टी स्मॉलकॅप-100 निर्देशांक अर्धा टक्‍क्‍यांनी पडला आहे. अशा परिस्तिथीत असे 5 स्टॉक तज्ज्ञांच्या नजरेत आले आहेत, ज्यांनी फक्त 4 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 52.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या सर्व शेअर्सचे तपशील

सेल्विन ट्रेडर्स :
सेल्विन ट्रेडर्स ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 21.69 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात सलग 4 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 52.57 टक्क्यांचा नफा कमावून दिला आहे. हा स्टॉक मागील 4 दिवसापूर्वी 17.50 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 26.70 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5.59 टक्क्यांच्या वाढीसह 26.70 रुपयांवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअरने 52.57 टक्क्यांच्या परताव्यासह आपल्या शेअर धारकांच्या 2 लाख रुपयेवर 3.04 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे. पण स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणे जोखमीचे असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा तरी तज्ञांचा सल्ला घ्या.

प्रीमियर कॅपिटल:
प्रीमियर कॅपिटल कंपनीने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचा शेअर 4.84 रुपयांवर ट्रेड करत होता जो आता वाढून 7.20 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समधे पैसे लावून 48.76 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 26.68 कोटी रुपये आहे. गेल्या 4 दिवसात या कंपनीने दिलेला 48.76 टक्के परतावा हा FD सारख्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा अनेक पटीने चांगला आहे. मागील शुक्रवारी हा स्टॉक जवळपास 10 टक्क्यांच्या वाढीसह 48.76 रुपयांवर ट्रेड करत होता.

टायगर लॉजिस्टिक्स:
टायगर लॉजिस्टिक्स कंपनी परतावा देण्याच्या बाबतीत कोणत्याही कंपनीच्या मागे नाही. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्स नी आपल्या गुंतवणुकदारांना 42.11 टक्के परतावा कमावून दिला होता. हा स्टॉक एका आठवड्यापूर्वी 228 रुपयांवर ट्रेड करत होता, जो आता वाढून 324 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअरमध्ये गुंतवणूक करून लोकांनी एका आठवड्यात 42.11 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 339.22 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 8.78 टक्क्यांच्या वाढीसह 324 रुपयांवर ट्रेड करत होता.

Flexituf Ventures:
Flexituf Ventures कंपनीने मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. हा स्टॉक गेल्या आठवड्यात 26.35 रुपयांवर ट्रेड करत होता, जो आता वाढून 36.05 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरमध्ये पैसे लावून गुंतवणूकदारांनी 36.81 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 90.08 कोटी रुपये आहे. मागील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 3 टक्क्यांच्या वाढीसह 36.05 रुपयांवर ट्रेड करत होता.

Space Incubtrix:
Space Incubtrix कंपनीने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस केला आहे. हा स्टॉक फक्त 2 रुपयांवर ट्रेड करत होता जो आता वाढून 2.72 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरमधून गुंतवणूकदारांनी 36 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे नजर भांडवल 9.41 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 4.23 टक्क्यांच्या घसरणीसह 2.72 रुपयांवर ट्रेड करत होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money shares which are in Focus of Stock market expert on 14 November 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x