17 April 2025 4:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Quick Money Stock | हा शेअरची किंमत आकाशाकडे झेपावणार, ही बातमी येताच शेअर खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड

Quick Money Stock

Quick Money Stock | टिमकेन इंडिया या बेअरिंग्ज निर्माता कंपनीचे शेअर्स कमालीचे वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता, आणि शेअर 3515.25 रुपयावर ट्रेड करत होता. टिमकेन इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीने गुजरातमध्ये भरूच या ठिकाणी एक नवीन उत्पादन प्रकल्प उभारला आहे. ही बातमी येताच कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त उसळी घेतली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिमकेन इंडिया कंपनीचा शेअर 2929.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

Timken India कंपनी आपला आणखी एक उत्पादन कारखाना गुजरात राज्यातील भरुच या ठिकाणी सुरू करणार आहे. Timken India कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामकला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, कंपनी नवीन उत्पादन कारखाना गुजरातमध्ये भरूच या ठिकाणी स्थापन करत आहे. हा नवीन प्लांट स्फेरिकल रोलर बेअरिंग (SAB) आणि दंडगोलाकार रोलर बेअरिंग (CRB) आणि त्याचे इतर घटक उत्पादन करणार आहे. ही कंपनी आपल्या उत्पादन प्लांटमध्ये प्रामुख्याने टेपर्ड रोलर बेअरिंग्ज (TRB) आणि त्याचे पार्टस बनवण्याचे काम सुरू करणार आहे.

Timken India कंपनी गुजरातमधील नवीन उत्पादन प्रकल्पात 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी उत्पादन प्रकल्पासाठी लागणारे फंड अंतर्गत स्त्रोतांद्वारे संकलित करणार आहे. या उत्पादन प्लांटद्वारे Timken India कंपनी अमेरिका , युरोपसह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपला उद्योग विस्तार करू इच्छित आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत टिमकेन इंडिया कंपनीने 97.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत 23 टक्के अधिक आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत Timken India कंपनीमे 792 कोटी रुपयांचा नफा संकलित केला होता.

सध्याचा कंपनीचा कार्यरत प्लांट गुजरात मध्ये भरूच या ठिकाणी आहे, त्याच जागेत कंपनीने नवीन कारखाना उभारण्याची तयारी केली आहे. जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत टिमकेन इंडिया कंपनीने 695.4 कोटी रुपये महसूल जमा केला होता. टिमकेन इंडिया कंपनीने मागील वर्षीच्या याच कालावधीत 557.9 कोटी रुपये महसूल जमा केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Stock of Timken India company is going to start new plant in Gujarat state on 18 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quick Money Stock(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या