15 November 2024 8:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

RACL Geartech Share Price | BMW आणि Lamborghini क्लाईंट असलेल्या कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा HDFC सिक्युरिटीजचा सल्ला

RACL Geartech Share Price

RACL Geartech Share Price | शेअर बाजारातील दिग्गज तज्ञ नेहमी म्हणतात की, “पैसा स्टॉक मार्केटमध्ये खरेदी-विक्रीने बनत नाही, तर संयम राखून बनतो”. शेअर बाजारात गुंतवणूक तेच लोक पैसे कमावतात जे लोक दीर्घकाळ त्यात टिकुन राहतात. जे बाजारात दीर्घकाळ टिकून राहण्याचे धाडस दाखवतात, ते लोक करोडपती होतात. असेच काहीसे आरएसीएल गिअरटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर होल्डर सोबत झाले आहे. आरएसीएल गिअरटेक लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, RACL Geartech Share Price | RACL Geartech Stock Price | BSE 520073)

आरएसीएल गिअरटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 4,600 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. HDFC सिक्युरिटीजने आरएसीएल गिअरटेक लिमिटेड कंपनीच्या महसूल/EBITDA/PAT आर्थिक वर्ष 2022 ते 2025 मध्ये अनुक्रमे 20%/22%/19% CAGR ने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीच्या विद्यमान ग्राहकांकडून मागणी वाढेल आणि आणखी नवीन ग्राहकांची भर पडेल, असा अंदाज HDFC सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे. 2014 मध्ये या कंपनीचे शेअर 8.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 0.068 टक्के वाढीसह 740.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, आरएसीएल गिअरटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 1.35 टक्क्यांध्या घसरणीसह 739.90 रुपयांवर क्लोज झाले होते. 6 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक 811 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आणि सध्या स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या 8 टक्के खाली ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने अंदाज व्यक्त केला आहे की, कंपनी पुढील काळात मजबूत आणि फायदेशीर वाढ कायम राखेल.

आरएसीएल गिअरटेक लिमिटेड कंपनी आपल्या विशेष उत्पादन क्षमतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नावाजलेला ब्रँड म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. आरएसीएल गिअरटेक लिमिटेड कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात BMW, Kubota, Dana आणि Lamborghini सारख्या काही लक्झरी OEMs ला आपले उत्पादन पुरवते. तर देशांतर्गत बाजारात Honda, Yamaha, KTM आणि Piaggio यांना कंपनी उत्पादन पुरवठा करते.

एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने आरएसीएल गिअरटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने स्टॉक खरेदी करण्यासाठी 710-725 किंमत जाहीर केली आहे. तर गुंतवणुकदार पुढील 2-3 महिना कालावधीसाठी हा स्टॉक 855 रुपये लक्ष किमतीसाठी होल्ड करु शकतात. असा सल्ला HDFC सिक्युरिटीजने दिला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कामगिरी :
आरएसीएल गिअरटेक लिमिटेड कंपनी जर्मनी, जपान, स्वित्झर्लंड, इटली, यूएसए, ऑस्ट्रिया, थायलंड अशा विकसित देशांत आपले उत्पादन निर्यात करते. आरएसीएल गिअरटेक लिमिटेड कंपनी मुख्यतः ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक अनुप्रयोगांसाठी ट्रान्समिशन गीअर्स आणि शाफ्टची निर्मिती देखील करते. वाढत्या व्यापारामुळे आणि मागणीमुळेच शेअर बाजारातील तज्ञांना या स्टॉकमध्ये मजबूत वाढ होईल असे वाटत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RACL Geartech Share Price 520073 Raclgear check details on 09 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x