22 November 2024 6:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger Stock | दीड-शहाणे दारूत पैसा ओततात, तर शहाणे या दारू कंपनीच्या शेअरमध्ये पैसा ओततात, 300% रिटर्न घेत खिसा टाईट

Multibagger Stock

Multibagger Stock | तुम्हाला तुमचे आयुष्य सुखी आणि समृद्ध बनवायचे असेल तर आतापासूनच योग्य ठिकाणी गुंतवणूक सुरू करा. अशा परिस्थितीत काही लोक FD आणि PPF सारख्या सुरक्षित गुंतवणुक पर्यायकडे बघतात. तर काही लोक उच्च जोखीम असूनही शेअर बाजारात पैसे लावतात. तथापि, उच्च जोखीम असूनही शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास खूप चांगला परतावा मिळतो. असे अनेक कंपनीचे शेअर्स आहेत, जे तुम्हाला अल्पावधीत मालामाल बनवू शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीच्या शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या अडीच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 300 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Radico Khaitan Share Price | Radico Khaitan Stock Price | BSE 532497 | NSE RADICO)

2.5 वर्षात 300 टक्के रिटर्न :
आपण ज्या कंपनीच्या शेअर्स बद्दल चर्चा करत आहोत, तो एका मद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीचा शेअर आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘रॅडिको खेतान लिमिटेड”. रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स सध्या 1,073 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 800 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या अडीच वर्षांत या शेअरने आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. कोरोना काळात मार्च 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 262.85 रुपये किमती पडले होते. तेव्हापासून आतापर्यंत या शेअरची किंमत 308 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या लोकांनी रॅडिको खेतान लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 2020 साली 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य डिसेंबर 2022 मध्ये 40,000 रुपयांपेक्षा अधिक वाढले आहे.

जानेवारी 2022 मध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 1246.85 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तथापि, शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढल्यामुळे शेअरची किंमत पडली. आणि मे 2022 महिन्यात शेअरची किंमत 760.60 रुपयांवर आली होती. तथापि, या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पुन्हा तेजी आली असून आज हा स्टॉक 1051.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात :
रॅडिको खेतान ही कंपनी भारतातील दिग्गज मद्य उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे दारूचे ब्रँड भारतातच नाही तर जगातील इतर देश जसे की, युरोपीय देश, यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि दक्षिण अमेरिका सह 85 पेक्षा अधिक देशांत निर्यात केले जातात. इंडियन मेड फॉरेन लिकर आणि देशी दारू व्यतिरिक्त कंपनी औद्योगिक मद्य आणि खत उत्पादन देखील करते.

रॅडिको खेतान कंपनीची स्थापना 1943 साली झाली होती. पूर्वी ही कंपनी रामपूर डिस्टिलरी अँड केमिकल कंपनी या नावने ओळखली जात होती. कंपनीचे उत्तर प्रदेश राज्यात रामपूर येथे,उत्तराखंड राज्यात बाजपूर येथे, थिम्मापूर-तेलंगणा, औंरंगाबाद-महाराष्ट्र आणि रिंगास राजस्थान या ठिकाणी मद्य उत्पादन केंद्र कार्यरत आहेत. या कंपनीच्या काही प्रसिद्ध ब्रँडमध्ये 8PM व्हिस्की, कॉन्टेसा रम, मॅजिक मोमेंट्स वोदका आणि जैसलमेर जिन सारख्या महाग ब्रॅण्डेड मद्यांचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Radico Khetan Share price has increased and investors has become billionaire in short term period on 16 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x