5 February 2025 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना
x

Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअर श्रीमंत करू शकतो, यापूर्वी 2605% परतावा दिला आहे - NSE: RAMASTEEL

Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | स्टॉक मार्केटमध्ये मंगळवारी सुद्धा तेजी (NSE: RAMASTEEL) दिसून आली. या तेजीत एक पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीचा शेअर सोमवारी १० टक्क्यांनी वाढला होता. आता मंगळवारी सुद्धा हा शेअर 2.07% तेजीसह 13.81 रुपयांवर पोहोचला आहे. बीएसई’वरील आकडेवारीनुसार, सोमवारी रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 38,03,347 ट्रेड पार पडले, त्यापैकी 49.21% शेअर्स डिलिव्हरीकडे गेले आणि एकूण 18,71,786 शेअर्स क्वांटिटी डिलिव्हरीकडे गेले. (रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनी अंश)

रामा स्टील ट्यूब्स शेअरची सध्याची स्थिती

रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनी शेअरने फक्त २ दिवसात 13 टक्के परतावा दिला आहे. दोन दिवसात या शेअर्सच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये प्रचंड वाढ दिसून आली. मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स शेअर 2.07 टक्के वाढून 13.81 रुपयांवर पोहोचला होता. रामा स्टील ट्यूब्स शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 17.55 रुपये होता, तर 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 9.90 रुपये होता. रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,143 कोटी रुपये आहे.

कंपनीकडून महत्त्वाची घोषणा

रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीने एक नवीन कंपनी स्थापन करण्याची घोषणा करताच कंपनीच्या शेअर्स वॉल्यूममध्ये मोठी वाढ झाली होती. रामा स्टील ट्यूब्स लिमिटेडने स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘कंपनी संचालक मंडळाने सोमवार, 02 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत “ओनिक्स आयपीपी प्रायव्हेट लिमिटेड” या नावाने नवीन कंपनी स्थापन करण्यास मान्यता दिली. ही प्रस्तावित कंपनी हरित ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात काम करेल.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

रमा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनी शेअरने मागील ५ वर्षात गुंतवणूकदारांना 2603% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना रमा स्टील ट्यूब्स शेअरने 1279% परतावा दिला आहे. मागील २ दिवसात या शेअरने १३% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Rama Steel Share Price 03 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x