15 January 2025 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Rama Steel Tubes Share Price | जबरदस्त शेअर! मागील 3 वर्षांत रामा स्टील ट्यूब्स शेअरने गुंतवणूकदारांना 3660% परतावा दिला, डिटेल्स पहा

Highlights:

  • Rama Steel Tubes Share Price
  • रामा स्टील ट्यूब्स स्टॉकमध्ये बंपर वाढ
  • रामा स्टील ट्यूब्स स्टॉकची कामगिरी
  • रामा स्टील ट्यूब्स शेअरच्या गुंतवणुकीवर परतावा
  • रामा स्टील ट्यूब्स कंपनी बद्दल थोडक्यात
Rama Steel Tubes Share Price

Rama Steel Tubes Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक्स शोधत असाल तर तुम्ही, ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर परतावा कमावून दिला आहे.

‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,890.31 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स 1.11 टक्के वाढीसह 41.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रामा स्टील ट्यूब्स स्टॉकमध्ये बंपर वाढ

मार्च 2023 च्या तिमाही निकालानंतर ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीने 58 टक्के वाढीसह 11.66 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीने 7.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. दरम्यान , मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 59 टक्के वाढीसह 399.24 कोटी रुपये महसूल ऑपरेशन्स मधून संकलित केला आहे. मार्च 2023 तिमाहीमध्ये कंपनीचा EBITDA 22.47 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 15.97 कोटी रुपयांच्या तुलनेत 40.7 टक्क्यांनी वाढला आहे.

रामा स्टील ट्यूब्स स्टॉकची कामगिरी

पूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 साठी , रामा स्टील ट्यूब्सचा निव्वळ नफा मागील वर्षी 27.32 कोटी रुपयांच्या तुलनेत जवळपास 27.44 कोटी रुपये होता तथापि , मार्च तिमाहीत त्याच्या ऑपरेशन्समधील महसूल 75 टक्क्यांनी वाढून 1.336.75 कोटी रुपये झाला आहे . गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये , रामा स्टील ट्यूब्सने बोर्डाच्या बैठकीत 4 : 1 बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली होती . कंपनीने सांगितले की बोनस शेअर इश्यू अंतर्गत 42.10 कोटी रुपयांचे शेअर्स जारी केले जातील .

रामा स्टील ट्यूब्स शेअरच्या गुंतवणुकीवर परतावा

रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 30.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 17.52 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 185.86 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील तीन वर्षांत या स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 3660 टक्के नफा मिळवून दिला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 3 वर्षात 37 पट अधिक वाढले आहेत. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 37 लाख रुपये झाले असते.

रामा स्टील ट्यूब्स कंपनी बद्दल थोडक्यात

रामा स्टील ट्यूब्स ही भारतातील स्टील पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन आणि पुरवठा करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या ग्राहकांमध्ये BSES, राजधानी पॉवर, गुजरात गॅस आणि UPCL यांसारख्या कंपन्या सामील आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rama Steel Tubes Share Price today on 02 June 2023.

हॅशटॅग्स

#Rama Steel Tubes Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x