7 January 2025 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE Penny Stocks | 5 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 156 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 531663 HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन श्रीमंत होणार नाही, या फंडाता गुंतवा, दरवर्षी 50 टक्क्यांनी पैसा वाढवा, पैशाने पैसा वाढवा Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Ration Card Update | तुमच्याकडे रेशन कार्ड आहे?, सरकारी दुकानातून रेशन घेण्याची पद्धत बदलली, अधिक जाणून घ्या

Ration Card Update

Ration Card Update | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभाग रेशन कार्ड नियमावलीत बदल करत आहे. खरं तर, हा विभाग सरकारी रेशन दुकानातून रेशन घेणाऱ्या पात्र लोकांसाठी निश्चित केलेल्या मानकांमध्ये बदल करीत आहे. नव्या दर्जाचा मसुदा आता जवळपास तयार झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारांसोबत बैठकांच्या अनेक फेऱ्याही झाल्या आहेत. नव्या तरतुदीत काय होणार ते जाणून घेऊयात.

श्रीमंत लोकही याचा फायदा घेत आहेत :
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या माहितीनुसार, सध्या देशभरातील 80 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा (एनएफएसए) लाभ घेत आहेत. त्यातले अनेक असे आहेत, जे आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण मंत्रालय मानकांमध्ये बदल करणार आहे. किंबहुना, आता नवीन मानक पूर्णपणे पारदर्शक करण्यात येणार आहे, जेणेकरून कोणतीही गडबड होणार नाही.

बदल का होत आहेत :
यासंदर्भात अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने सांगितले की, मानकांमधील बदलासंदर्भात गेल्या सहा महिन्यांपासून राज्यांसोबत बैठक होत आहे. राज्यांनी केलेल्या सूचनांचा समावेश असलेल्या पात्रांसाठी नवीन मानके तयार केली जात आहेत. ही मानके लवकरच निश्चित केली जातील. नवीन मानक लागू झाल्यानंतर केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल, अपात्र लोकांना लाभ मिळू शकणार नाही. गरजूंना लक्षात घेऊन हा बदल केला जात आहे.

वन नेशन, वन रेशन कार्ड स्कीम :
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी डिसेंबर 2020 पर्यंत ‘वन नेशन, वन रेशन कार्ड (ओएनओआरसी) योजना’ लागू केली आहे. एनएफएसए अंतर्गत सुमारे ६९ कोटी लाभार्थी म्हणजेच ८६ टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्याला सुमारे दीड कोटी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन याचा फायदा घेत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Ration Card Update from Department of Food and Public Distribution check details 06 October 2022.

हॅशटॅग्स

#Ration Card Update(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x