11 January 2025 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Rattan Power Share Price | 18 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार! 3 महिन्यात दिला 125% परतावा, पैशाने पैसा वाढवा

Rattan Power Share Price

Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 18.84 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनी अंश )

YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 105 टक्के वाढवले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 360 टक्के वाढली आहे. या काळात हा शेअर 4 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.16 टक्के वाढीसह 18.37 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रतन इंडिया पॉवर लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या खाजगी वीज निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची महाराष्ट्रातील अमरावती आणि नाशिक स्थित औष्णिक ऊर्जा केंद्रांची स्थापित क्षमता 2,700 MW आहे. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,117.28 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 21.13 रुपये आहे. आणि नीचांकी किंमत 3.96 रुपये होती.

मार्च 2024 तिमाहीत रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीने 10,665.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.  मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 483.19 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीचे महसूल संकलन 988.64 कोटी रुपयेवरून वाढून 995.73 कोटी रुपयेवर पोहचले आहे.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 8,896.75 रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षात या कंपनीला 1,869.85 कोटी रुपये तोटा झाला होता. संपूर्ण आर्थिक वर्षात रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न 3,704.78 कोटी रुपयेवरून 3,559.36 कोटी रुपयेवर आले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattan Power Share Price NSE Live 19 June 2024.

हॅशटॅग्स

Rattan Power Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x