15 January 2025 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Rattan Power Share Price | शेअर प्राईस ₹16, स्टॉकची जोरदार खरेदी सुरु, यापूर्वी दिला 1180% परतावा

Rattan Power Share Price

Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 29 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 2.31 टक्क्यांच्या घसरणीसह 16.49 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक जोरदार तेजीत वाढत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8,855 कोटी रुपये आहे. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )

रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 21.13 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 4.67 रुपये होती. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 2.61 टक्के वाढीसह 16.92 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रतन इंडिया पॉवर ही भारतात वीज निर्मिती करणारी सर्वात मोठया खाजगी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीकडे महाराष्ट्रात अमरावती आणि नाशिकमध्ये एकूण 2700 मेगावॅट औष्णिक वीज प्रकल्पांची क्षमता आहे. मागील 5 वर्षांत रतन इंडिया पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 58 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 914 कोटी रुपयेची निव्वळ विक्री नोंदवली होती. तर मार्च 2023 मध्ये कंपनीने 901 कोटी रुपये विक्री केली होती. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 106.66 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर मार्च 2023 तिमाहीत या कंपनीला 483 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

2023-24 या संपूर्ण आर्थिक वर्षात रतन इंडिया पॉवर कंपनीने 3364 कोटी रुपये निव्वळ विक्री नोंदवली होती. तर 2022-23 मध्ये कंपनीने 3231 कोटी रुपये विक्री नोंदवली होती. 2022-23 मध्ये या कंपनीला 1870 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. तर 2023-24 मध्ये कंपनीने 8897 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला होता.

सलग 3 वर्षांच्या निव्वळ तोट्यानंतर रतन इंडिया पॉवर कंपनी नफ्यात आली आहे. 2019 पासून ही कंपनी सातत्याने आपल्या कर्जाची परतफेड करत आहे. FII ने रतन इंडिया पॉवर कंपनीमधील भागीदारी 4.38 टक्केपर्यंत वाढवली आहे. पूर्वी FII कडे रतन इंडिया पॉवर कंपनीचे 3.38 टक्के भागभांडवल होते.

मागील 5 वर्षात रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1180 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या 6 महिन्यांत रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात रतन इंडिया पॉवर स्टॉक 79 टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 230 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattan Power Share Price NSE Live 31 July 2024.

हॅशटॅग्स

Rattan Power Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x