18 November 2024 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

RattanIndia Enterprises Share Price | बँक FD किती टक्के वार्षिक व्याज देते? रतन इंडिया शेअरने 1 दिवसात 20% परतावा दिला

RattanIndia Enterprises Share Price

RattanIndia Enterprises Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पहायला मिळत होती. मात्र आज स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 54.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

रतन इंडिया एंटरप्रायझेस हा स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली होती. नुकताच रतन इंडिया एंटरप्रायझेस या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले, आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली. आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 7.40 टक्के घसरणीसह 50.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जून 2023 तिमाहीत रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीने 178.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाही कालावधीत रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीला 216 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. जून 2023 तिमाहीत रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीच्या महसुलात 83.8 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर जून तीमहित कंपनीने 1267.6 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

मागील वर्षी जून तिमाहीत रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीने 689.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याच वेळी जून तिमाहीत कंपनीच्या EBITDA मध्ये वाढ झाली असून, कंपनीचा EBITDA 1.5 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर कंपनीच्या एकूण EBITDA मार्जिन 0.1 टक्के आहे.

मागील एका वर्षात रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दुहेरी अंकी नफा कमावून दिला आहे. या कालावधीत सेन्सेक्स इंडेक्स फक्त 25 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 18.04 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27.07 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्क्यांनी वाढली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स 58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RattanIndia Enterprises Share Price today on 10 August 2023.

हॅशटॅग्स

RattanIndia Enterprises Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x