15 January 2025 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

RattanIndia Power Share Price | एका वडापावच्या किंमतीचा शेअर खरेदी करा, स्वस्त शेअर मालामाल करणार

RattanIndia Power Share Price

RattanIndia Power Share Price | रतन इंडिया पॉवर स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3.98 टक्क्यांच्या वाढीसह 17.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 17.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रतन इंडिया पॉवर अंश )

4 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 21.13 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 4.67 रुपये होती. आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक (Rattan Power Share Price) 3.24 टक्के घसरणीसह 16.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीने 93 कोटी रुपये नफा कमावला होता. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 549.4 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. जून तिमाहीत कंपनीचा ऑपरेशनल महसूल वर्ष दर वर्ष आधारावर 10 टक्क्यांनी वाढून 931.8 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जून 2023 तिमाहीत या कंपनीचा महसूल 847.3 कोटी रुपये होता. जून तिमाहीत या कंपनीचा EBITDA 20 टक्क्यांनी वाढून 188.6 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर एबिटा मार्जिन 20.2 टक्क्यावर पोहचला आहे. जो मागील वर्षी जून तिमाहीत 18.5 टक्क्यावर होता.

भारतातील विजेच्या वापरात मागील 13 वर्षांत जोरदार वाढ पाहायला मिळाली आहे. याकाळात भारतातील विजेचा वापर वार्षिक सरासरी 11 टक्क्यांनी वाढला आहे. जून तिमाहीत भारतातील विजेचे एकूण उत्पादन 482 अब्ज युनिट्स होते, ज्यामध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, आणि इतर अक्षय ऊर्जा पर्याय सामील होते. भारताची नूतनीकरणक्षम ऊर्जेची स्थापित क्षमता 148 GW आहे. भारत अजूनही ऊर्जा निर्मितीसाठी औष्णिक कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पावर अवलंबून आहे.

रतन इंडिया पॉवर ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या खाजगी वीज निर्मात्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीकडे अमरावती आणि नाशिक येथे प्रत्येकी 1,350 औष्णिक उर्जा क्षमता असलेले प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता 2,700 मेगावॅट आहे. रतन इंडिया पॉवर कंपनीमध्ये प्रवर्तकानी 44.06 टक्के भागभांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 55.94 टक्के भागभांडवल धारण केले आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने रतन इंडिया पॉवर कंपनीचे 4.38 टक्के भागभांडवल धारण केले आहे. तर REC Limited कंपनीने या कंपनीचे 1.72 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RattanIndia Power Share Price NSE Live 05 August 2024.

हॅशटॅग्स

Rattanindia Power Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x