22 February 2025 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

RBL Bank Share Price | या शेअरने 6 महिन्यांत 125% परतावा दिला, आता 'या' बातमीनंतर स्टॉक अजून तेजीत येणार, खरेदी करावा?

RBL Bank Share price

RBL Bank Share Price | आरबीएल बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आरबीएल बँकेच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आपली आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आरबीएल बँकेच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त तेजी उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली होती. ट्रेडिंग सेशनमध्ये खाजगी क्षेत्रातील आरबीएल बँकेच्या शेअर्सनी 189.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी गाठली होती. कालच्या (06 Friday 2023) ट्रेडिंग सेशनमध्ये आरबीएल बँकेचे शेअर्स 183.95 रुपये किमतीवर बंद झाले होते. आपल्या जाहीर तिमाही निकालात आरबीएल बँकेने माहिती दिली होती की, रिटेल बँकिंग व्यापारात 12 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे, तर घाऊक व्यापारात 17 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, RBL Bank Share Price | RBL Bank Stock Price | BSE 540065 | NSE RBLBANK)

RBL बँकेच्या शेअर्सची लक्ष किंमत :
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते आरबीएल बँकने आर्थिक वर्ष 2022-2023 च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांपूर्वी मजबूत Q3 व्यवसाय अपडेट्स दिले आहेत. बँकेने जाहीर केलेल्या नवीन माहीतीनुसार आरबीएल बँक आपल्या बुडीत कर्जाच्या समस्येतून बाहेर पडून नफ्याकडे वाटचाल करत आहे. आणि हे बँकिंग व्यापार वाढीचे योग्य द्योतक मानले जाते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते आरबीएल बँकेच्या शेअरमध्ये 178 रुपयेच्या स्तराजवळ मजबूत सपोर्ट लेव्हल तयार झाली आहे. पुढील काळात हा स्टॉक 200 रुपयेच्या वर जाऊ शकतो.

6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 125 टक्के परतावा
मागील 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आरबीएल बँकेच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. बीएसई इंडेक्सवर 6 जानेवारी 2023 रोजी आरबीएल बँकेचे शेअर्स 183.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आरबीएल बँकेच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 125 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअर्सची किंमत 20 टक्के मजबूत झाली आहे. आरबीएल बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 74.15 रुपये होती.

खरेदी, विक्री, होल्ड ?
चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी आरबीएल बँकेच्या शेअर्सवर ‘खरेदी आणि होल्ड’ धोरण स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांचे म्हणणें आहे की, आरबीएल बँकेचे शेअर्स मागील बऱ्याच काळापासून सतत तेजीत वाढत आहेत. पुढील आणखी काही ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकमध्ये तेजीचा कल पाहायला मिळू शकतो. आरबीएल बँक शेअरची 178 रुपये किंमत पातळीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांनी गुंतवणूकदारांना 200 रुपयांच्या अल्प मुदतीच्या टार्गेटसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, मात्र 178 रुपयेवर स्टॉप लॉस लावणे अत्यावश्यक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RBL Bank Share Price 540065 RBLBANK in focus check details on 07 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RBL Bank Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x