18 November 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

RBZ Jewellers Share Price | 127 रुपयाचा शेअर सलग 4 दिवस अप्पर सर्किट हीट करत परतावा देतोय, अल्पावधीत मोठी कमाई

RBZ Jewellers Share Price

RBZ Jewellers Share Price | मागील 4 ट्रेडिंग सेशनपासून RBZ ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. RBZ ज्वेलर्स कंपनीचा IPO गेल्या महिन्यात शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. लिस्टिंग झाल्यापासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहेत.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी गा कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 121.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी RBZ ज्वेलर्स स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 127.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

RBZ ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी गुंतवणुकदारांना 21 टक्के नफा दिला होता. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज सलग पाचव्या दिवशी RBZ ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे IPO शेअर्स आजपर्यंत होल्ड केले आहेत, त्यांना 21.50 टक्के नफा मिळाला आहे.

RBZ ज्वेलर्स या कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मुल्य 10 रुपये होते. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 95 ते 100 रुपये निश्चित केली होती. RBZ ज्वेलर्स कंपनीने आपल्या आयपीओमध्ये एका लॉट अंतर्गत 150 शेअर्स ठेवले होते. किरकोळ गुंतवणूकदारांना RBZ ज्वेलर्स कंपनीचा एक IPO लॉट खरेदी करण्यासाठी किमान 15,000 रुपये जमा करावे लागले होते. किरकोळ एकावेळी कमाल 13 लॉट खरेदी करू शकत होता.

RBZ ज्वेलर्स कंपनीचे IPO शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले आहे. RBZ ज्वेलर्स कंपनीचा IPO 19 डिसेंबर 21 डिसेंबर 2023 दरम्यान लाँच करण्यात आला होता. RBZ ज्वेलर्स कंपनीच्या IPO सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या अवघ्या 3 दिवसांत हा IPO 26 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RBZ Jewellers Share Price NSE Live 02 January 2024.

हॅशटॅग्स

RBZ Jewellers Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x