15 January 2025 3:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

REC Share Price | शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, हा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली

REC Share Price

REC Share Price | आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-जून तिमाहीत आरईसी लिमिटेड कंपनीने 1,12,747 कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-जून तिमाहीत वार्षिक आधारावर कंपनीच्या कर्ज मंजुरीत 24.17 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत आरईसी लिमिटेड कंपनीने 90,797 कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. ( आरईसी लिमिटेड कंपनी अंश )

वार्षिक आधारावर आरईसी लिमिटेड कंपनीचे कर्ज वितरण 27.89 टक्क्यांच्या वाढीसह 43,652 कोटी रुपये झाले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 530.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 607.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 159.15 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.49 टक्के घसरणीसह 536.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आरईसी लिमिटेड ही कंपनी मुख्यतः भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करते. आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-जून तिमाहीत आरईसी लिमिटेड कंपनीने अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी 39,655 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ऊर्जा क्षेत्रासाठी कंपनीचे कर्ज वाटप 58.72 टक्के वाढले आहे.

आरईसी लिमिटेड ही नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. ही कंपनी भारतातील ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना वित्तपुरवठा करण्याचा व्यवसाय करते. मागील एका वर्षांत आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 234 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 33.40 टक्के वाढवले आहेत.

मागील 3 महिन्यांत आरईसी लिमिटेड कंपनीच्या स्टॉकची किंमत 22.10 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत भारत सरकारचा वाटा 52.60 टक्के आहे. या कंपनीत सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 11.96 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. परकीय गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 19.91 टक्के भागभांडवल धारण केले आहे, तर म्युच्युअल फंड संस्थांनी या कंपनीचे 9.48 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | REC Share Price NSE Live 02 July 2024.

हॅशटॅग्स

REC share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x