29 June 2024 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 30 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Standard Capital Share Price | शेअर प्राईस 1 रुपये 58 पैसे! चिल्लर गुंतवणूक करा, 6 महिन्यात दिला 490% परतावा BEL Share Price | संधी सोडू नका! PSU स्टॉक फायद्याचा ठरणार, शॉर्ट टर्ममध्ये होईल मोठी कमाई Yes Bank Share Price | येस बँक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | शेअर प्राईस 1 रुपया 11 पैसे! हे 10 पेनी शेअर्स मालामाल करणार, रोज अप्पर सर्किट हिट Vodafone Idea Share Price | कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा?
x

Rekha Jhunjhunwala | रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील बँक शेअरला तज्ज्ञांची BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा

Rekha Jhunjhunwala

Rekha Jhunjhunwala | मागील काही दिवसापासून फेडरल बँक स्टॉकमध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. या बँकेचे शेअर्स गुंतवणुकदारांना एफडीपेक्षा जास्त परतावा कमावून देत आहेत. जितका परतावा तुम्हाला एफडी गुंतवणुकीतून एका वर्षात मिळतो, तेवढा नफा फेडरल बँक स्टॉक एका महिन्यात देतो. या बँकेच्या शेअर्समध्ये दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील पैसे लावले आहेत. ( फेडरल बँक अंश )

मागील एका महिन्यात फेडरल बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी फेडरल बँक स्टॉक 174.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी फेडरल बँक स्टॉक 0.59 टक्के वाढीसह 176.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. रेखा झुनझुनवाला यांनी फेडरल बँकमध्ये 668.1 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. 31 मार्च 2024 पर्यंत त्यांच्याकडे फेडरल बँकेचे 3.8 कोटी शेअर्स होते.

मागील काही काळापासून रेखा झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेतील आपली शेअरहोल्डिंग कमी केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. शेअर बाजारातील तज्ञांनी फेडरल बँकेचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स 190 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तसेच तज्ञांनी गुंतवणूकदारांना पैसे लावताना 168 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

फेडरल बँकेचे एकूण बाजार भांडवल 42,757 कोटी रुपये आहे. या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 175.20 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 120.90 रुपये होती. मार्च 2024 तिमाहीत फेडरल बँकेने 5,978.35 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर डिसेंबर तिमाहीत या बँकेने 5,730.10 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च तिमाहीत फेडरल बँकेने 906.30 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर डिसेंबर तिमाहीत या बँकेने 1,006.74 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील एका महिन्यात फेडरल बँकेचे शेअर्स 6.41 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या बँकेचे शेअर 40.15 टक्के आणि तीन वर्षात 104.28 टक्के वाढले आहेत. ही बँक स्वतंत्रपूर्व काळापासून भारतात बँकिंग व्यवसाय करत आहे. या बँकेची स्थापना त्रावणकोर कंपनी नियमन, 1916 अंतर्गत 23 एप्रिल 1931 रोजी त्रावणकोर फेडरल बँक लिमिटेड या नावाने करण्यात आली होती. नंतर डिसेंबर 1949 मध्ये बँकेचे नाव बदलून फेडरल बँक लिमिटेड असे करण्यात आले.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rekha Jhunjhunwala Portfolio Federal Bank Share Price NSE Live 19 June 2024.

हॅशटॅग्स

Rekha Jhunjhunwala(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x