Relaxo Footwears Share Price | बँक FD ने अशक्य ते शेअर बाजारात शक्य, या शेअरने 1 लाखावर दिला 55 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स
Relaxo Footwears Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही एक कला आहे. यासाठी खूप संयम राखणे आवश्यक आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमी दीर्घ कालीन दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. आज या लेखात आपण ज्या स्टॉक बाबत चर्चा करणार आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयांवर 55 कोटी रुपये परतावा मिळवून दिला आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, ‘रिलॅक्सो फुटवेअर्स’. चला जाणून घेऊ या स्टॉकबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Relaxo Footwears Share Price | Relaxo Footwears Stock Price | BSE 530517 | NSE RELAXO)
एक लाखावर दिला 55 कोटी परतावा :
एकेकाळी ‘रिलॅक्सो फुटवेअर्स’ कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक म्हणून ओळखले जात होते. भारतातील सर्वात मोठी फुटवेअर उत्पादक कंपनी रिलॅक्सोने अवघ्या 23 वर्षात आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीची स्थापना 1984 साली करण्यात आली होती. आज ही कंपनी भारतातील टॉप 500 मौल्यवान कंपन्यांमध्ये सामील आहे. या कंपनीने स्थापनेपासून आतापर्यंत गुंतवणुकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहेत. ज्या लोकांनी सुरुवातीच्या काळात या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांना आतापर्यंत बोनस शेअर्स मिळाल्यावर खूप मोठा फायदा झाला आहे.
पेनी स्टॉकचा परतावा :
23 वर्षापूर्वी ज्या कोकणी रिलॅक्सो कंपनीच्या शेअरमध्ये एक लाखाची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 55 कोटी रुपये झाले आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी रिलॅक्सो फूटवेअर्स कंपनीचे शेअर्स 2.35 टक्के घसरणीसह 814.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 0.41% घसरून 807 रुपयांवर क्लोज झाला. 12 नोव्हेंबर 1999 रोजी रिलॅक्सो फुटवेअर कंपनीचे शेअर्स 1.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच 1999 मध्ये ज्यां लोकांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना आतपर्यंत 69,855 टक्के परतावा मिळाला आहे.
Relaxo कंपनीचा बोनस शेअर इतिहास :
1999 साली ज्या लोकांनी या शेअरमध्ये 1.46 रुपये दराने पैसे लावले होते, त्याना एकूण 68,493 शेअर मिळाले होते. 8 डिसेंबर 2000 रोजी पहिल्यांदा या कंपनीने 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. यानंतर, कंपनीने पुन्हा 1 जुलै 2015 रोजी दुसऱ्यांदा आणि 26 जून 2019 रोजी तिसऱ्यांदा बोनस शेअर्सचे वाटप केले होते.
एकूण शेअर्सची 5.48 लाख झाली :
तीन वेळा बोनस शेअर्स वाटप केल्याने गुंतवणूकदारांच्या शेअरहोल्डिंग मध्ये जबरदस्त वाढ झाली आणि शेअरची संख्या 68,493 शेअर्स वाढून 5,47,944 वर गेली. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचा जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे. सध्याच्या 5.48 लाख शेअरचे मूल्य 55 कोटींहून जास्त वाढले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Relaxo Footwears Share Price 530517 stock market live on 30 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN