
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या मालकीच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 28 ऑगस्ट 2023 पासून रिलायन्स कॅपिटल स्टॉक तेजीत वाढत आहे. आज देखील जा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीसह 11.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील एका आठवड्यात रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एक वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 28 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 3.49 टक्के वाढीसह 11.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 5 वर्षांत रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 97 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2008 मध्ये रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 2770 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर कंपनीवर कर्ज वाढत गेलं आणि शेअरची किंमत कमी होत गेली. 2008 नंतर 2020 पर्यंत रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरची किंमत 99 टक्के कमजोर झाली होती.
सध्या रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे, कारण गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत 2022-23 या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल सादर केला जाणार आहे. कंपनी आपल्या सर्व प्रस्तावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शेअर धारकांचे मतदान घेणार आहे.
कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटल कंपनीने जून 2023 तिमाहीमध्ये 444 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 491 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. एप्रिल-जून 2023 दरम्यान कंपनीने एकूण 6,001 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
मागील वर्षीच्या जून तिमाहीत कंपनीने 3,604 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. रिलायन्स कॅपिटल कंपनीने स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीचा एकूण खर्च मागील वर्षीच्या जून तिमाहीत 4,068 कोटी रुपये होता, जो आता जून 2023 तिमाहीत 5,560 कोटी रुपयेवर पोहचला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























