Reliance Communications Share Price | अनिल अंबानींच्या कंपनीचे चक्र जिओ'मुळे फिरणार? शेअर बाबत अनेक चर्चांना उधाण, डिटेल्स वाचा
Reliance Communications Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असलेले उद्योगपती अनिल अंबानींचे असे काही दिवस फिरले की, त्यांच्या अनेक कंपन्या सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. यापैकी एक कंपनी म्हणजे, ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’. दूरसंचार क्षेत्रातील या कंपनीला लोक ‘आरकॉम’ म्हणूनही ओळखतात. मागील आठवड्याच्या चौथ्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरकॉम कंपनीचे शेअर्स 1.17 टक्के घसरणीसह 1.69 रुपये किमतीवर बंद झाले होते. 2007 मध्ये या कंपनीचे शेअर्स 786 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. याकाळात आरकॉम कंपनीचे शेअर्स 100 टक्के कमजोर झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Communications Share Price | Reliance Communications Stock Price | BSE 532712 | NSE RCOM)
रिलायन्स जिओकडून मोठ्या हालचाली
मागील एका वर्षाच्या कालावधीत या कंपनीचे शेअर्स 59 टक्के कमजोर झाले आहेत. मागील बऱ्याच महिन्यापासून बातमी येत आहे की, आरकॉम कंपनीचे संपत्ती अधिग्रहण करण्यासाठी मुकेश अंबानींच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीने करार केला आहे. भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी ‘रिलायन्स जिओ’ने अनिल अंबानींच्या कर्जबाजारी रिलायन्स इन्फ्राटेल कंपनीचे मोबाईल टॉवर आणि फायबर मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘रिलायन्स जिओ’ कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एस्क्रो खात्यात 3720 कोटी रुपये जमा केल्याची बातमी देखील आली होती. 4 मार्च 2020 रोजी जिओच्या रिझोल्यूशन प्लॅनला कमिटी ऑफ क्रेडिटर्सने 100 टक्के मतांनी मंजुरी देखील दिली आहे.
RITL कंपनीकडे भारतात 1.78 लाख किलोमीटर लांबीची फायबर मालमत्ता आणि 43,540 मोबाइल टॉवर आहेत. अनिल धीरूभाई अंबानी समूहाची ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’ ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. 2016 मध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ लॉन्च केल्यानंतर फ्री डेटा आणि कॉल सुविधा द्यायला सुरुवात केली. मात्र या प्राइस वॉरमुळे आरकॉम कंपनीच्या अडचणी वाढल्या. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअरच्या किंमतीचा इतिहास खूपच खराब आहे. या कंपनीचे शेअर्स 2 नोव्हेंबर 2007 रोजी 786 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.78 टक्के घसरणीसह 1.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या काळात ज्या लोकांनी आर कॉम स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 200 रुपये झाले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Communications Share Price 532712 RCOM stock market live on 28 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे