16 April 2025 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Reliance Group | रिलायन्स अनेक छोटे किराणा आणि नॉन फूड ब्रँड विकत घेणार | शेअर्स गुंतवणूकदारांना उत्सुकता

Reliance Group

Reliance Group | मुकेश अंबानी ग्राहकोपयोगी वस्तू व्यवसायातील सर्वात मोठा खेळाडू बनण्याची तयारी करत आहेत. भारतातील सर्वात मोठी रिटेलर रिलायन्स डझनभर लहान किराणा आणि नॉन-फूड ब्रँड खरेदी करण्याची शक्यता आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये ६.५ अब्ज डॉलरचा व्यापार करण्याचे रिलायन्सचे उद्दिष्ट आहे. यामुळे युनिलिव्हरसारख्या परदेशी दिग्गजाला कडवी झुंज देता येईल. या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सूत्रांनी रॉयटर्सला ही माहिती दिली आहे.

Mukesh Ambani is preparing to become the biggest player in the consumer goods business. India’s largest retailer Reliance may acquire dozens of small grocery and non-food brands :

जाणून घ्या काय आहे अंबानींचा प्लान:
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स येत्या सहा महिन्यांत 50 ते 60 किराणा, घरगुती आणि पर्सनल केअर ब्रँडचा मोठा पोर्टफोलिओ तयार करण्याच्या विचारात आहे. त्याच वेळी, देशातील सर्वात मोठे रिटेल आउटलेट बनविण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने वितरण सहभागींची नेमणूक करण्यास सुरवात केली गेली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स जवळपास 30 मोठ्या आणि प्रसिद्ध लॉकर कंझ्युमर ब्रँडसोबत चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहे. कंपनीला लवकरात लवकर हा करार अंतिम करायचा आहे. माहितीनुसार, रिलायन्स एकतर या ब्रँड्सचा संपूर्ण ताबा घेईल किंवा जॉइंट व्हेंचर पार्टनरशिप अंतर्गत करेल. मात्र, रिलायन्सने या प्रकरणी सध्या तरी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाच वर्षांत 500 अब्ज रुपये विक्रीचे लक्ष्य :
हा ब्रँड मिळवण्यासाठी कंपनी किती गुंतवणूक करेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रिलायन्सने पाच वर्षांत या व्यवसायातून वार्षिक ५०० अब्ज रुपयांची (६.५ अब्ज डॉलर) विक्री गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे अन्य एका सूत्राने सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या अधिग्रहणानंतर रिलायन्स वेगवेगळ्या ब्रँडचं घर बनणार आहे.

या ब्रँड्सना आव्हान :
नव्या बिझनेस प्लॅनमुळे रिलायन्सला नेस्ले, युनिलिव्हर, पेप्सिको इंक आणि कोकाकोला यांसारख्या जगातील काही मोठ्या ग्राहक समूहांना आव्हान द्यायचं आहे. या कंपन्या अनेक दशकांपासून भारतात काम करत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Reliance Group may acquire many consumer goods brands check details 15 May 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या