18 November 2024 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा रिलायन्स होम फायनान्स शेअर सुसाट तेजीत, रोज अप्पर सर्किट हिट

Reliance Home Finance Share Price

Reliance Home Finance Share Price | उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. अनिल अंबानींच्या बहुतेक कंपन्या दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जात आहेत. प्रचंड कर्ज आणि विविध आव्हाने यामुळे या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. ( रिलायन्स होम फायनान्स कंपनी अंश )

अशा परिस्थितीत ज्या गुंतवणूकदारांनी रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले होते, त्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स 4.48 टक्के वाढीसह 3.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स एकेकाळी 110 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 5 रुपये किमतीच्या खाली घसरला आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहे. जानेवारी 2024 मध्ये रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स 6.22 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 7 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 110 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 99 टक्क्यांनी घसरून 3.5 रुपये किमतीवर आला आहे.

रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या प्रवर्तक गटात अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय सामील आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीपर्यंत रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 0.74 टक्के शेअर्स होल्ड केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 99.26 टक्के शेअर्स होल्ड केले आहे. जून 2023 महिन्यात रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 43.61 टक्के शेअर्स होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे कंपनीचे 56.39 टक्के शेअर्स होते.

अनिल अंबानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे 2,73,891 शेअर्स आहेत. तर त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्या पोर्टफोलओमध्ये कंपनीचे 2,63,474 शेअर्स आहेत. रिलायन्स होम फायनान्स कंपनीला ईएसएम अर्थात सेबीच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. याचा उद्देश गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा असतो. साधारणपणे, शेअर्समधील प्रचंड अस्थिरता पाहून सेबी असे शेअर्स निरीक्षणाच्या कक्षेत आणते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Home Finance Share Price NSE Live 07 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Home Finance Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x