Reliance industries Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स तेजीत येणार? या बातमीने गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, स्टॉक तपशील जाणून घ्या
Highlights:
- Reliance industries Share Price
- बिझनेस अहवालात माहिती समोर आली
- प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात काय म्हटले?
- सौर उत्पादनासह हायड्रोजन एनर्जी बाजारपेठेत प्रवेश करण्याचा निर्णय
- शेअर्स 5 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर

Reliance industries Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 2030 पर्यंत सौर ऊर्जा आणि हायड्रोजन या नवीन ऊर्जा व्यवसायांमधून 10-15 अब्ज डॉलर्स कमाईचे लक्ष निश्चित केले आहे. यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज नवीन कंपन्याचे अधिग्रहण करून किंवा भागीदारीद्वारे तंत्रज्ञानातील त्याचे मर्यादित कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. (Reliance industries Share Price Today)
बिझनेस अहवालात माहिती समोर आली
एका बिझनेस अहवालात अशी माहिती समोर आली आहे की, 2050 पर्यंत भारतात 2,000 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीसह स्वच्छ ऊर्जा जसे की, सौर, बॅटरी, इलेक्ट्रोलायझर्स आणि इंधन सेल व्यवसाय हा भारतात रिलायन्ससाठी नवीन विकास स्तंभ असेल. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के (Reliance industries Share Price NSE) वाढीसह 2,546.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Reliance industries Share Price BSE)
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात काय म्हटले?
भारताने आपल्या शाश्वत विकास लक्षमध्ये 2030 पर्यंत 280 GW सौर क्षमता आणि 5 दशलक्ष टन ग्रीन H2 उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. एका प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, प्रवासी आणि व्यावसायिक वाहन श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2030 पर्यंत पाच टक्के होईल. तर दुचाकींच्या बाबतीत ही संख्या 21 टक्केवर पोहोचेल. स्वच्छ ऊर्जेचा एकूण बाजारचा आकार सध्या 10 अब्ज डॉलर आहे, जो 2030 पर्यंत वाढून 30 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 2050 पर्यंत हा ग्रीन एनर्जी मार्केट 200 बिलियन डॉलर्स वाढण्याची शक्यता आहे.
सौर उत्पादनासह हायड्रोजन एनर्जी बाजारपेठेत प्रवेश करण्याचा निर्णय
खनिज तेलापासून ते दूरसंचार सेवापर्यंत कार्यरत असलेल्या रिलायन्स समूहाने सौर उत्पादनासह हायड्रोजन एनर्जी बाजारपेठेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स कंपनी 2030 पर्यंत 100 GW स्थापित सौर ऊर्जा निर्मिती क्षमता प्राप्त करण्याची योजना आखत आहे. हे प्रमाण पूर्ण भारताच्या एकूण 280GW क्षमेतेच्या 35 टक्के असेल. रिलायन्स कंपनी 2030 पर्यंत भारतातील 60 टक्के सोलर मार्केट, 30 टक्के बॅटरी मार्केट, 20 टक्के हायड्रोजन मार्केट काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. यातून कंपनीला तब्बल 10-15 बिलियन डॉलर्स नफा मिळण्याचा अंदाज आहे.
शेअर्स 5 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर
भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स आपल्या 5 महिन्यांच्या सर्वोच्च किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही स्टॉक चार्ट चे निरीक्षण केले ते तुम्हाला समजेल की, स्टॉक तांत्रिक बाबतीत सकारात्मक संकेत देत आहे. रिलायन्स कंपनी आपल्या खनिज तेल आणि टेलिकॉम व्यवसाय वाढविण्याचा विचार करत आहे. अशा स्थितीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळेल. या सर्व बाबी लक्षात घेऊन तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 2670 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance industries Share price today on 20 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर रेल्वे कंपनी शेअर 6 महिन्यात 33% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: RVNL