18 November 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स तेजीत, ऑर्डरबुक मजबूत झाली, अप्पर सर्किट हिट, पुढे किती परतावा?

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मेट्रो वन प्रोजेक्टमधील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या भाग भांडवल खरेदी कराराला मंजुरी दिली आहे. मुंबई मेट्रो वन हा प्रकल्प PPP म्हणजेच सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्प म्हणून विकसित करण्यात येत आहे. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि खाजगी कंपन्यांचा वाटा आहे. ही बातमी येताच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमध्ये उसळी पाहायला मिळाली. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 8.45 टक्के वाढीसह 202.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मुंबई मेट्रो वन प्रोजेक्टमध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी म्हणजेच MMRDA ने महाराष्ट्र सरकारतर्फे गुंतवणूक केली आहे. यात एमएमआरडीएचा वाटा 26 टक्के आहे. तर अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने या प्रोजेक्टमध्ये 74 टक्के गुंतवणूक केली आहे. त्यांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 4000 कोटी रुपये आहे. आता महाराष्ट्र राज्य सरकार अनिल अंबानी यांचा वाटा 4000 कोटी रुपये किमतीवर खरेदी करणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रोजेक्ट बिल्ड ऑपरेट-ट्रान्सफर मॉडेल अंतर्गत 2007 मध्ये सुरू करण्यात आलेला मुंबई शहरातील पहिला मेट्रो प्रकल्प होता. हा संयुक्त उपक्रम भागीदारांमुळे एक मोठा वादाचा विषय ठरला होता.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 196.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 11 जानेवारी 2008 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 2486.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली. आणि स्टॉक अक्षरशः 99 टक्क्यांनी खाली आला होता. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर आले होते.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या प्रवर्तकांनी या कंपनीचे 16.50 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर उर्वरित 83.39 टक्के वाटा सार्वजनिक गुंतवणूकदारांनी होल्ड केला आहे. या कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये अनिल अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे. यामध्ये अनिल अंबानीच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे 1,39,437 शेअर्स आहेत. तर त्यांच्या पत्नी टीना यांनी कंपनीचे 1,23,812 शेअर्स होल्ड केले आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुख्यतः वीज, रस्ते, मेट्रो रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधां उभारणीचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 14 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x