18 November 2024 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Reliance Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रिलायन्स इन्फ्रा शेअरने 2 दिवसात 20 टक्के परतावा दिला, खरेदी करावा

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांकच्या वाढीसह 262.20 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्सने लोअर सर्किट स्पर्श केला आहे. मागील 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 टक्क्यांनी वाढली होती. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

शुक्रवारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, त्यांची गुंतवणूक असलेल्या रिलायन्स पॉवर कंपनीने ICICI बँकेसोबत कर्ज सेटलमेंट करण्याचा समझोता करार केला आहे. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 4.67 टक्के घसरणीसह 244 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 99 टक्के कमजोर झाले होते. 4 जानेवारी 2008 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 2510.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर आले होते. 18 मार्च 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 262.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 4 वर्षांत रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2750 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 20 मार्च 2023 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 148.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 6 महिन्यांत रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 177 रुपयेवरून वाढून 262 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 131.40 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 19 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x