Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 9 रुपयेवरून वाढून 195 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 2000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये पैसे लावले आहेत. आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 2.16 टक्के वाढीसह 195.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 308 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 131.40 रुपये होती. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 193.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 21 लाख रुपये झाले असते.
मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 23 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. लेटेस्ट न्यूजनुसार शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार विजय केडिया यांनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 40 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. मार्च 2024 तिमाहीतील रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, विजय केडिया यांनी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे 40 लाख शेअर्स म्हणजेच जवळपास कंपनीचे 1.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
विजय केडिया यांनी त्यांच्या पूर्ण मालकीच्या केडिया सिक्युरिटीज कंपनीच्या माध्यमातून रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहे. सरकारी विमा कंपनी एलआयसीने रिलायन्स इन्फ्रा कंपनीमधील आपला हिस्सा विकला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Infra Share Price NSE Live 25 April 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे