26 April 2025 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल
x

Reliance Infra Share Price | या शेअरने 4 वर्षांत 3000 टक्के परतावा दिला, आता कंपनी कर्जमुक्त होण्याच्या दिशेने

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या अनिल अंबानींच्या कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 286.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित तेजीसह ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची किंमत जवळपास 22 टक्क्यांनी मजबूत झाली होती. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लवकरच जेसी फ्लॉवर्स एसेंट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे 2100 कोटी रुपयेची थकबाकी कर्ज फेडणार आहे, अशी बातमी येताच शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.23 टक्के वाढीसह 278 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 4 वर्षांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमवून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 286.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 31.16 लाख रुपये झाले असते.

मागील एका वर्षात रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 23 मार्च 2023 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 148.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 670 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत. याकाळात कंपनीचे शेअर्स 36.55 रुपयेवरून वाढून 286.70 रुपये किमतीवर पोहचले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 131.40 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 26 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony