22 February 2025 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा
x

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये सुसाट तेजी, गुंतवणूकदारानी मोठ्या प्रमाणात शेअर खरेदीला सुरुवात केली, नेमकं कारण काय?

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 157.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सप्टेंबर 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स 201.35 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर जुलै 2022 मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकने 100.75 रुपये ही आपली रुपयेची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळीवर स्पर्श केली होती. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 3.33 टक्के वाढीसह 160 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या शेअर धारकांना 375 टक्के नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील दोन वर्षांच्या कालावधीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने लोकांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षाच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने लोकांना 53.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. जेव्हा संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला होता तेव्हा 2008 मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 2500 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आपल्या काही मालमत्ता विकून भांडवल उभारणी करणार आहे. क्यूब हायवेज, ब्रुकफील्ड आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड यासारखे आघाडीचे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक फंड यांनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मालमत्तांचे मूल्य 2,000 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी महाराष्ट्रात पुणे-सातारा टोल रोड, होसूर कृष्णागिरी टोल रोड आणि सेलम उलेंदरपेट टोल रोड विकून भांडवल उभारणीचा प्रयत्न करत आहे. या तीनही टोल रस्त्यांची एकूण लांबी 350 किमी असून, त्याचे मूल्य 2000 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 9 रस्ते प्रकल्प आहेत, ज्यांचीची एकूण लांबी 700 किमी पेक्षा जास्त आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price today on 30 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x