Reliance Power Share Price | 22 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर अल्पावधीत मालामाल करतोय, स्वस्त स्टॉकची खरेदी वाढली
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तथापि चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या सुरुवातीपासून रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स तेजीचे प्रदर्शन करत होते. मार्च 2023 च्या शेवटी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 9.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 20 रुपयांचा पार गेले आहेत.
YTD आधारे रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 4.70 रुपयेवरून वाढून 22.50 रुपये किमतीवर पोहचले आहेत. शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 1.32 टक्के वाढीसह 22.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील सहा महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 65.31 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 13 रुपये किमतीवरून वाढून 22.40 रुपये किमतीवर पोहचले आहे.
एकेकाळी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 261 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर हा स्टॉक 90 टक्के घसरला. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 25.19 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 9.05 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8,544.67 कोटी रुपये आहे.
सप्टेंबर 2023 तिमाहीमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचा निव्वळ तोटा 237.76 कोटी रुपये इतका कमी झाला आहे. कारण सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीने जास्त महसूल संकलित केले होते. मागील वर्षी याच तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीला 340.26 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीने 1945.14 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जो या तिमाहीत वाढून 2,130.83 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
रिलायन्स पॉवर कंपनी पूर्वी रिलायन्स एनर्जी जनरेशन लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. ही कंपनी अनिल धीरूभाई अंबानी यांच्या मालकीच्या समूहाचा एक भाग आहे.सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 24.49 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Power Share Price NSE 23 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE