31 January 2025 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये! पॉवर सेक्टरमधील शेअर्स तेजीत, रिलायन्स पॉवरला फायदा होणार?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात आले आहेत. मागील काही काळापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू होती. मात्र अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर, रिलायन्स पॉवर स्टॉक मंदीच्या गर्तेत अडकला आहे.

एकीकडे शेअर बाजारातील गुंतवणूकदार पॉवर आणि एनर्जी सेक्टरमधील शेअर्सवर पैसे गुंतवत आहेत, तर दुसरीकडे पॉवर सेक्टरमधील कंपनी असून देखील रिलायन्स पॉवर स्टॉक घसरला आहे. शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.34 टक्के घसरणीसह 28.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 28.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर 33.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या संचालक मंडळाच्या बैठकीत डिसेंबर 2023 चे तिमाही निकाल जाहीर केले जातील. सप्टेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीला 237.76 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मात्र या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वाढून 2130 कोटी रुपयेवर पोहचले होते. डिसेंबर 2023 पर्यंत रिलायन्स पॉवर कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 24.49 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 75.51 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

अनिल अंबानी यांच्याकडे रिलायन्स पॉवर कंपनीचे 4,65,792 शेअर्स आहेत. तर या कंपनीच्या प्रवर्तक गटात रिलायन्स इन्फ्रा कंपनी देखील सामील आहे. रिलायन्स इन्फ्रा कंपनीने रिलायन्स पॉवर कंपनीचे 93,01,04,490 शेअर्स होल्ड केले आहेत. अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांनी रिलायन्स पॉवर कंपनीचे 4,12,708 शेअर्स होल्ड केले आहेत. अनिल अंबानींच्या दोन्ही मुलांनी या कंपनीचे 4,17,500 शेअर्स हॉल्ड केले आहेत. 1995 साली स्थापन झालेल्या रिलायन्स पॉवर कंपनीची कार्यरत वीज निर्मिती क्षमता 416 GW आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 03 February 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x