10 November 2024 5:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 68 पैशाचा शेअर धुमाकूळ घालणार, एका वडापावच्या किंमतीत 30 शेअर्स येतील, मोठी कमाई होईल - BOM: 539217 Penny Stocks | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, संधी सोडू नका, झटपट 143% परतावा दिला - BOM: 524444 त्यांचं ते जनाब, आपलं जनाब ते कुछ भी अनाब शनाब, क्या सही कहा ना जनाब, भाजपा-प्रेमी राज ठाकरेंची पोलखोल CIBIL Score | नोकरदारांनो, 'या' 4 प्रकारे झटपट वाढेल तुमचा सिबिल स्कोअर, पटापट मंजूर होईल पगारदारांचं कर्ज - Marathi News SBI Mutual Fund | SBI बँक FD विसरा, SBI म्युच्युअल फंडाच्या या 5 योजना वर्षाला 63% पर्यंत परतावा देतील - Marathi News Vodafone Idea Share Price | पेनी शेअर नीचांकी किंमतीजवळ आला, पुढे काय करावं, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA NPS Calculator | पगारदारांनो, महागाई प्रचंड वाढतेय, महिना 1.5 लाख रुपये पेन्शन हवी असल्यास NPS मध्ये किती बचत करावी
x

Reliance Power Share Price | शेअर प्राईस 25 रुपये! कंपनी कर्ज मुक्तीच्या दीशेने, स्टॉक 'BUY' करावा? फायदा होईल?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीला 397.66 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत रिलायन्स पॉवर कंपनीने 321.79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी अंश )

यावर्षी इंधनाच्या किमती वाढल्याने रिलायन्स पॉवर कंपनीच्या तोट्यात भर पडली आहे. आज सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.70 टक्के घसरणीसह 25.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 2,193.85 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 1,853.32 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च तिमाहीत कंपनीच्या इंधनाचा खर्च वाढून 953.67 कोटी रुपये झाला आहे, जो आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जानेवारी-मार्च मध्ये 823.47 कोटी रुपये नोंदवला गेला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनीचा तोटा वाढून 2,068.38 कोटी रुपये झाला, जो 2022-23 या आर्थिक वर्षात 470.77 कोटी रुपये होता.

मागील आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स पॉवर स्टॉक एक टक्क्यांच्या वाढीसह 27.27 रुपये किमतीवर पोहचला होता. 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर 34.35 रुपये किमतीवर पोहचले होते. ही कंपनी सध्या आपल्या कर्जाची परतफेड करत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या दोन सहायक कंपन्यांनी ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीला 1023 कोटी रुपये कर्जाची परतफेड केली आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या दोन उपकंपन्या कालाई पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि रिलायन्स क्लीनजेन लिमिटेड यांनी रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड या ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीच्या उपकंपनीसोबत कर्ज परतफेड करण्यासाठी करार केला आहे. त्याच वेळी रिलायन्स पॉवर कंपनीने महाराष्ट्रातील आपला 45 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प JSW रिन्यूएबल एनर्जी कंपनीला विकला आहे. या मालमत्तांच्या विक्रीतून जमा झालेला निधी कंपनी कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 27 May 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x