19 January 2025 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, अपडेट नोट करा - NSE: TATASTEEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Reliance Power Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार 42 रुपयाचा शेअर, कर्ज मुक्त कंपनी फोकसमध्ये - NSE: RPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: IRB
x

Reliance Power Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार 42 रुपयाचा शेअर, कर्ज मुक्त कंपनी फोकसमध्ये - NSE: RPOWER

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या महिन्याभरात 10.17 टक्क्यांनी घसरला आहे. ४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या ५४.२५ रुपये या उच्चांकी पातळीवरून रिलायन्स पॉवर शेअर जवळपास ३० टक्क्यांनी घसरला आहे. शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स पॉवर शेअर 2.31 टक्क्यांनी वाढून 42.15 रुपयांवर पोहोचला होता. बॅलेन्सशीट मधील सकारात्मक सुधारणांमुळे रिलायन्स पॉवर शेअर पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे रिलायन्स पॉवर कंपनीवरील कर्ज लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याने गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढली आहे.

रिलायन्स पॉवर शेअर टार्गेट प्राईस

मागील वर्षभरात रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक सुद्धा मजबूत झाली आहे, जे शेअर्समधील तेजीचं दुसरं कारण आहे. फिनव्हर्सिफाई ब्रोकरेज फर्मच्या स्टॉक मार्केट विश्लेषक ध्वनी पटेल यांनी रिलायन्स पॉवरचे कंपनी शेअर्सबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते, ‘रिलायन्स पॉवर कंपनी शेअर्स २०२३ पासून तेजीत आहे आणि शेअर्समधील खरेदी हे सकारात्मक संकेत आहेत. तसेच रिलायन्स पॉवर कंपनी शेअर्समध्ये नव्याने खरेदीचा ट्रेंड सुरु असल्याने हे पुढील तेजीसाठी महत्वाचं आहे. शॉर्ट टर्ममध्ये रिलायन्स पॉवर कंपनी शेअर ४८ रुपयांपर्यंत वाढू शकतो असं ध्वनी पटेल यांनी म्हटलं आहे.

रिलायन्स पॉवर शेअरने किती परतावा दिला

गेल्या वर्षभरात रिलायन्स पॉवर कंपनी शेअरने 42.64 टक्के परतावा दिला आहे. मागील दोन वर्षांत रिलायन्स पॉवर शेअरने १७७ टक्के परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स पॉवर कंपनी शेअरने 1,656.25 टक्के परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये रिलायन्स पॉवर शेअर 82.46 टक्क्यांनी घसरला आहे.

रिलायन्स पॉवर शेअरहोल्डिंग पॅटर्न

रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ‘एफआयआयने सप्टेंबर 2024 तिमाहीत रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीतील आपली हिस्सेदारी 13.13 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे, जी जून 2024 तिमाहीत 12.71 टक्के होती. रिलायन्स पॉवर कंपनीत प्रवर्तकांची हिस्सेदारी २३.२६ टक्के होती, तर विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंडांची रिलायन्स पॉवर कंपनीत जवळपास ३ टक्के हिस्सेदारी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Power Share Price Saturday 19 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x