Reliance Power Share Price | 13 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअरमध्ये कमालीची उसळी, शेअर रोज अप्पर सर्किट तोडत आहे, खरेदी करणार?
Highlights:
- Reliance Power Share Price
- सध्या शेअरची किंमत
- शेअरची कामगिरी
- मागील एक महिनाचा परतावा
- तज्ञांचे मत

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 13.22 टक्क्यांच्या वाढीसह 13.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या 9.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या 51.38 टक्के पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत.
सध्या शेअरची किंमत
सध्या शेअरची किंमत आपल्या 24.95 रुपये या वार्षिक उच्चांक किमतीच्या तुलनेत 45.09 टक्के कमी आहे. मागील वर्षी 6 सप्टेंबर रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 24.95 रुपये या उच्चांक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.78 टक्के वाढीसह 13.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची कामगिरी :
अनिल अंबानीं यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर 2023 मध्ये 7.68 टक्क्यांनी कमजोर झाले होते. मागील वर्षी या कंपनीचे शेअर्स 12.15 टक्क्यांनी मजबूत झाले होते. या कंपनीच्या शेअरने मागील तीन महिन्यांत शेअर धारकांना 27 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील एक महिनाचा परतावा
रिलायन्स पॉवर कंपनीचा मागील एक महिनाचा आणि एका आठवड्याचा परतावा देखील सकारात्मक आहे. मे 2008 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4800 कोटी रुपये आहे.
स्टॉक मधील तेजीचे कारण म्हणजे रिलायन्स पॉवर कंपनीने आपली उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या कर्जदारांना 1,200 कोटी रुपये मूल्याची वनटाइम सेटलमेंट ऑफर जाहीर केली होती. यानंतर सेबीने रिलायन्स पॉवर कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले होते.
प्रत्युत्तरात रिलायन्स पॉवर कंपनीने ही माहिती फेटाळून लावली होती. असा कोणताही निर्णय कंपनीने घेतला नसल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यासोबत कंपनीने शेअरच्या वाढत्या किमतीवर कोणतेही भाष्य करू शकत नाही, असे म्हंटले आहे.
तज्ञांचे मत :
अलिकडेच रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर 11 रुपये किमतीच्या खाली घसरले होते. आता स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहायला मिळत आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 17-18 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असे तज्ञांनी म्हंटले आहे. Tips2trades फर्मच्या मते अल्पावधीत रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 14-15 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Power Share Price today on 26 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
FAQ's
आपण रिलायन्स पॉवर शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.
कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. २६ मे २०२३ रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअरची किंमत रु.१२.१० आहे.
मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. 26 मे 2023 रोजी रिलायन्स पॉवरचे मार्केट कॅप 4,800 कोटी रुपये आहे.
26 मे 2023 पर्यंत रिलायन्स पॉवरचे पीई आणि पीबी गुणोत्तर 135.8532 आणि 0.41394 आहे.
52 आठवड्यांचा उच्चांक/नीचांकी दर हा त्या दिलेल्या कालावधीत (1 वर्षासारखा) रिलायन्स पॉवरच्या शेअरने व्यवहार केलेला सर्वोच्च आणि सर्वात कमी दर आहे आणि तो तांत्रिक सूचक मानला जातो. 26 मे 2023 रोजी रिलायन्स पॉवरचे 52 आठवड्यांचे उच्चांकी आणि नीचांकी मूल्य 24.95 रुपये आणि 9.05 रुपये आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA