25 October 2024 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअर विक्रमी उच्चांकावरून 32% घसरला, ही स्वस्तात खरेदीची संधी आहे का - NSE: NHPC Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL NBCC Share Price | एनबीसीसी शेअरबाबत मोठे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत परतावा देणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 38% पर्यंत कमाई होईल - NSE: BEL Rattan Power Share Price | 13 रुपयाचा रतन इंडिया पॉवर फोकसमध्ये, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RTNPOWER
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत परतावा देणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्स सोमवार २८ ऑक्टोबर रोजी एक्स-स्प्लिट ट्रेड (NSE: RELIANCE) करणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने इक्विटी शेअर्स जारी करण्यासाठी ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात दिलेल्या तारखेपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्स असतील ते बोनस शेअर्ससाठी पात्र मानले जातील. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 1:1 गुणोत्तरात फ्री बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली होती. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी संचालक मंडळाने अधिकृत भागभांडवल 15000 कोटी रुपयांवरून 50000 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.01 टक्के घसरून 2,652.55 रुपयांवर पोहोचला होता.

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेजने म्हटले आहे की, ‘मागील दिवाळीपासून निफ्टीमध्ये जवळपास 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि जागतिक आर्थिक मंदीची चिंता तसेच भू-राजकीय चिंता ही अर्थव्यवस्थेच्या एकूण जीडीपी वाढीसाठी संभाव्य जोखीम आहे, असे जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म म्हटले आहे की,’ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी ही ऑइल रिफायनिंग अँड पेट्रोकेमिकल्स, ई अँड पी, डिजिटल सर्व्हिसेस, रिटेल, न्यू एनर्जी आणि मीडिया मध्ये पसरलेल्या व्यवसायांसह एक वैविध्यपूर्ण कंपनी ग्रुप आहे. तसेच पुढील ३ ते ४ वर्षांत जिओ आणि रिटेल व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वाढवण्याची रिलायन्स ग्रुपची योजना आहे. तसेच रिलायन्स ग्रुपने हरित ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्याने ते भविष्यासाठी चांगले संकेत आहेत.

रिलायन्स ग्रुपचा उत्पन्न वाढीचा वेग सर्वच विभागांमध्ये मजबूत असल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या अंदाजानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2024-27 मध्ये वार्षिक 15% PAT वाढ नोंदवली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी ३५०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना पुढील ६ ते १२ महिन्यांत २८% परतावा मिळू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x