Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक अपसाईड रॅलीसाठी सज्ज, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मजबूत उलथापालथ पाहायला मिळाली होती. दरम्यान निफ्टी इंडेक्सने 23481 ही नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक सज्ज झाला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 8 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकतो. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 2944 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभरात हा स्टॉक 2920 रुपये किमतीवर गेला होता. या कालावधीत 4.06 लाखांपेक्षा जास्त शेअर्स ट्रेड झाले होते. आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.26 टक्के वाढीसह 2,938 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, नैसर्गिक वायू, रिटेल, मनोरंजन, दूरसंचार आणि कापड यासह अनेक क्षेत्रात व्यवसाय करते. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 3200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना नुकसान टाळण्यासाठी तज्ञांनी 2900 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 28 टक्के वाढले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने ऑगस्ट 2023 मध्ये आपल्या शेअरधारकांना 9 रुपये लाभांश वाटप केला होता. ऑगस्ट 2022 मध्ये देखील या कंपनीने गुंतवणूकदारांना 8 रुपये लाभांश वाटप केला होता. 2019, 2020 आणि 2021 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने अनुक्रमे 6.5 रुपये, 6.5 रुपये आणि 7 रुपये लाभांश वाटप करून गुंतवणुकदारांना मालामाल केले होते. ऑक्टोबर 2023 पासून रिलायन्स स्टॉकमध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. याकाळात हा शेअर 2225 रुपये पातळीवरून 3029 रुपये किमतीवर गेला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Share Price NSE Live 14 June 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS