22 January 2025 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

Reliance Share Price | भरवशाचा शेअर रॉकेट स्पीडने वाढणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, किती आहे टार्गेट प्राईस?

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.92 टक्क्यांच्या घसरणीसह 2,932.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे (RIL Share Price) एकूण बाजार भांडवल 19,84,005 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी आपल्या दूरसंचार कंपन्यांच्या माध्यमातून भारतातील वाढती डेटा मागणी आणि दूरसंचार दरांमध्ये संभाव्य वाढीचा फायदा घेण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )

BNP पारिबसने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टोअर-स्पेसचा विस्तार तेजीत होत आहे. आणि कंपनीच्या अपस्ट्रीम ऑइल आणि KG-D6 गॅस फील्डमधून नवीन उत्पादन सुरू झाल्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.53 टक्के घसरणीसह 2,896.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या सौर, बॅटरी, इंधन सेल आणि हायड्रोजन या हरित ऊर्जा व्यवसायात आशादायक चित्र पाहायला मिळत आहे. अनेक तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. BNP परिबसच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स कंपनीच्या दूरसंचार व्यवसायाचा EBITDA आर्थिक वर्ष 2025-2026 पर्यंत 11.5 पट वाढू शकतो. यासह तज्ञांच्या मते, रिलायन्स रिटेल कंपनीचा EBITDA आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत 35 पट वाढू शकतो.

तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या ऑइल-टू-केमिकल्स विभागाचे EBITDA मूल्य आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत 7.5 पटीने वाढू शकते. BNP पारिबसच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 3,239 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील एका वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 14.93 टक्के वाढला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 20.67 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price NSE Live 29 May 2024.

हॅशटॅग्स

Reliance Share price(114)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x