17 November 2024 11:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 29 ऑगस्ट रोजी कंपनीची (NSE: Reliance) वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक देशांतर्गत आणि जागतिक ब्रोकरेज कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या कामगिरीबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. अनेक तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकची टारगेट प्राइस वाढवली आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )

अनेक ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, कंपनीच्या महसुलात 16 टक्के चक्रवाढ दराने वाढ होऊ शकते. तसेच Jio कंपनीचा EBITDA 20 टक्के CAGR दराने वाढण्याची अपेक्षा आहे. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.020 टक्के वाढीसह 2,996.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

बर्नस्टीन फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकची टारगेट प्राइस 3,440 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स एक टक्क्याने वाढून 3,022.65 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 20.5 लाख कोटी रुपये आहे. 2024 मध्ये आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 17 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. CLSA फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग देऊन 3,300 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या नवीन ऊर्जा व्यवसाय रोडमॅपवर जोर दिला आहे. कंपनीने 2035 पर्यंत नेट कार्बन झिरो होण्यासाठी 5 कारखान्यांच्या उभारणीत वेगवान प्रगती केली आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने Jio कंपनीच्या JioAirFiber च्या बाजारपेठेचा विस्तार केला आहे. कंपनीने म्हंटले आहे की, JioBharat फोनमध्ये भारताला ‘2G-मुक्त’ बनवण्याची शक्यता आहे.

FY24 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा डिजिटल बिझनेस कॅपेक्स 57,400 कोटी रुपये नोंदवला गेला होता. यात एकत्रित 86 अब्ज डॉलर्स गुंतवणूक झाली होती. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने जून तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 5 टक्क्यांनी घट नोंदवली होती.

जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 15,138 कोटी रुपये नोंदवला गेला होता. कंपनीचा ऑपरेशन्समधील महसुल 12 टक्क्यांनी वाढून 2.36 लाख कोटी रुपये नोंदवला गेला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक स्टॉकवर 10 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कंपनीने 19 ऑगस्ट हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता.

News Title | Reliance Share Price NSE: RELIANCE 24 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Share price(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x