10 January 2025 2:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी ग्लोबल नकारात्मक संकेतांमुळे स्टॉक मार्केट मजबूत घसरला होता. सध्या शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु आहे. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ५२८ अंकांनी घसरला होता. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील 23,550 च्या खाली पोहोचला होता. एका बाजूला शेअर बाजारात घसरत असताना दुसरीकडे टॉप ग्लोबल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरबाबत रेटिंग जाहीर करण्यासह टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर 0.69 टक्क्यांनी घसरून 1,256.80 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,608.80 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 1,201.50 रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 16,99,387 कोटी रुपये आहे.

टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश – रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर 1662 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर सध्याच्या १२६० रुपयांच्या पातळीपासून ३० टक्क्यांनी वाढू शकतो असं मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे. तसेच जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी 1690 रुपये टार्गेट प्राईस सह ‘बाय’ कॉल दिला आहे. तर बर्नस्टीन ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग सह 1520 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 1.68% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर 2.96% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 20.97% घसरला आहे. मागील १ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर 2.59% घसरला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 63.95% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 4,640.85% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 3.33% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Thursday 09 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(107)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x