Remedium Lifecare Share Price | करोडपती बनवणारा शेअर! रेमिडियम लाइफकेअर शेअरने मागील 5 वर्षांत 32460 टक्के परतावा दिला
Remedium Lifecare Share Price | रेमिडियम लाइफकेअर या फार्मा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 5 रुपयेवरून वाढून 1600 रुपयेवर गेले आहेत. या काळात रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 32000 टक्के नफा कमावून दिला आहे.
रेमिडियम लाइफकेअर या फार्मा कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. तर आता ही कंपनी आपले स्टॉक स्प्लिट करणार आहे. आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे शेअर 1.92 टक्के घसरणीसह 1,630.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट :
रेमिडियम लाइफकेअर या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आणि आता ही कंपनी आपले शेअर्स 1 : 2 या प्रमाणात विभाजित करणार आहे. ही कंपनी आता आपले 10 दर्शनी मूल्याचे शेअर्स 5 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्समध्ये विभाजित करणार आहे.
रेमिडियम लाइफकेअर या कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 1 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. यापूर्वी रेमिडियम लाइफकेअर या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 9 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच या कंपनीने गुंतवणुकदारांना 5 शेअर्सवर 9 बोनस शेअर्स मोफत दिले होते. आता जे बोनस शेअर्स वाटप करण्यात आले आहेत, त्यासाठी कंपनीने 28 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली होती.
शेअरची कामगिरी :
10 ऑगस्ट 2018 रोजी रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 4.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. पाच वर्षांपुर्वी ज्या लोकांनी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3 कोटी पेक्षा जास्त झाले आहे. 9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1639.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 32460 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी Remedium Lifecare कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 3.30 कोटी रुपये नफा मिळाला असता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Remedium Lifecare Share Price today on 10 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल