
Remedium Lifecare Share Price | शेअर बाजार आपल्या नवीन उच्चांकावर पोहचला असताना, रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली. आजही हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3,818.40 रुपये या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
स्टॉकची 52 आठवड्यांची पातळी
रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 136.15 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के वाढीसह 3,830 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
6 महिन्यात 2600 टक्के परतावा
1 डिसेंबर 2022 रोजीच्या किमतीच्या तुलनेत रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2,616.62 टक्के वाढले आहेत. 1 डिसेंबर 2022 रोजी सेन्सेक्सने आपली सर्वकालीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. 22 जून 2023 रोजी सेन्सेक्सने पूर्वीच्या सर्वकालीन उच्चांक पातळीला तोडले आहे. सेन्सेक्सची सर्वकालीन उच्चांक पातळी 63601.71 होती. मागील सहा महिन्यात रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2600 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 66.74 टक्के वाढला आहे.
रेमेडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दिनांक 23 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
कंपनी शेअर्स स्प्लिटचा निर्णय देखील घेऊ शकते
याशिवाय कंपनी आपले शेअर्स स्प्लिटचा निर्णय देखील घेऊ शकते. त्याचप्रमाणे कंपनी कर्ज रोखे जारी करून कर्ज घेण्याची मर्यादा 50 कोटींवरून 1000 कोटी रुपयेपर्यंत वाढवू शकते. आणि नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
रेमेडियम लाइफकेअर कंपनीने अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस किंवा ‘APIs’ बनवण्याची घोषणा केली असून, या कामाला सुरुवात देखील केली आहे. फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील एकात्मता आणि वैविध्य विचारात घेऊन रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीने हैदराबादमधील उत्पादन सुविधां केंद्राचे धोरणात्मक संपादन पूर्ण केले आहे. रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड ही कंपनी उत्पादने आणि सेवा संबंधित दोन व्यवसायात गुंतलेली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























