Rent Vs Lease Agreement | रेंट आणि लीज अॅग्रीमेंटमधील फरक आहे तरी काय?, लक्षात ठेवा अन्यथा आर्थिक गोंधळ होईल
Rent Vs Lease Agreement | घर, गाडी, विमान, जहाज अशा अनेक गोष्टी भाडे तत्वावर घेतल्या जातात. यावेळी करार रेंट ऍग्रीमेंट नुसार करावा की लीज नुसार हा प्रश्न मात्र अनेकांना पडतो. जेव्हा एखादी वस्तू, मालमत्ता आपण भाड्याने घेतो तेव्हा त्याचा करार होणे बंधनकारक आहे. मात्र अनेक व्यक्तींच्या मनात लीज आणि रेंट अॅग्रीमेंट या विषयी संभ्रम कायम आहे. त्यामुळे भाडेकरारातील या दोन्ही गोष्टींची माहिती आणि त्यांच्यातील फरक जाणून घेऊ.
रेंट अॅग्रीमेंट
रेंट अॅग्रीमेंट हे कमी कालावधीसाठी एखादी वस्तू वापरण्यासाठी घेतल्यास केले जाते. यात काही महिन्यांचा करार केला जातो. हा करार स्टॅंम्प पेपरवर मालकाने करून घेणे गरजेचे. या करारात मालक आणि भाडेकरू अशा दोन घटकांचा समावेश असतो. दोघांची रेंट अॅग्रीमेंटवर स्वाक्षरी घेणे बंधनकारक असते. तसेच यात एक वर्षापेक्षा कमी कालावधीचा करार असतो. संबंधीत वस्तू अथवा मालमत्ता ही भाडेकरू वापर असेल तरी त्याचा यावर मालकी हक्क नसतो. त्यामुळे त्यात काही बिघाड, दुरुस्ती असल्यास भाडेकरूला त्याचा खर्च करावा लागत नाही. झालेला बिघाड दुरुस्त करण्याचे काम मालकाचे असते.
उदा., समजा तुम्ही तुमचे घर भाड्याने दिले आहे तर त्यात होणारी दुरूस्तीची कामे तुम्हाला करावी लागतात. तसेच या करारात कामासाठी २ महिने लॅपटॉप भाड्याने घेणे, एखादी कार आथवा रिक्षा भाड्याने चालवणे याचा समावेश होतो. एकंदर रेंट अॅग्रीमेंट हे २, ३, ६, ८, १० आणि ११ महिन्यांसाठी केले जाते.
लीज अॅग्रीमेंट
लीज अॅग्रीमेंटमध्ये दोन ते १० वर्षांसाठी करार केला जातो. यामध्ये जास्त कालावधीसाठी संबंधीत वस्तू घेतली असल्यास त्याचे लीज अॅग्रीमेंट केले जाते. यात त्या वस्तूवर मालकी हक्क भाडेकरूचा नसला तरी त्यातील बिघाड भाडेकरूला दुरुस्त करावा लागतो. उदा., ऑफिस, जहाज, विमान, घर अशा अनेक गोष्टी तुम्ही काही वर्षांसाठी घेत असाल तर तुम्हाला लीज अॅग्रीमेंट करणे गरजेचे आहे. लीज अॅग्रीमेंटला
डीड असेही म्हटले जाते. हा करार २०, ३० किंवा ५० वर्षांचा देखील असू शकतो. त्यामुळे कराराची मुदत संपल्यावर ही मालमत्ता भाडेकरू नमुद नियमांचे पालन करून विकत घेऊ शकतो. लीज अॅग्रीमेंटचे काही प्रकार देखील आहेत. यात एकल गुंतवणूकदार लीज, विक्री आणि लीज बॅक, ओपन एंडेड लीज, डोमेस्टिक लीज, आर्थिक लीज आहेत.
रेंट आणि लीज अॅग्रीमेंटमधील फरक
* रेंट आणि लीज या दोघांमध्ये सर्वात पहिला फरक म्हणजे कालावधीचा आहे. ११ महिन्यांचा करार असल्यास ते रेंटमध्ये येते. तर ११ महिन्यांहून अधिक कालावधीसाठी करार अल्यास लीज अॅग्रीमेंट करावे लागते.
* रेंटमध्ये मालक सर्व नुकसानाला जबाबदार ठरतो, लीजमध्ये भाडेकरू जबाबदार ठरतो.
* रेंट अॅग्रीमेंट आपोआप रिन्यू होते, तर लीज अॅग्रीमेंट कालावधी संपल्यावर रिन्यू करून घ्यावे लागते. अन्यथा ती वस्तू भाडेकरूच्या मालकी हक्काची होते.
* रेंट अॅग्रीमेंटमध्ये काही कारणास्तव मालक अॅग्रीमेंट रद्द करून भाडेरूला घर खाली करण्यास सांगू शकतो, तर लीज अॅग्रीमेंटमध्ये असे केल्यास मालकावर कायदेशीर कारवाई होते.
लेखांकन मानकानुसार रेंटसाठी विशेश नियम नाहीत मात्र लीजसाठी अनेक नियम नमूद आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Rent Vs Lease Agreement difference need to know check details 13 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY