5 November 2024 8:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

Restaurant Brands Asia Share Price | बर्गर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीचा शेअर एकदिवसात 14% वाढला, स्टॉकची डिटेल्स पहा

Restaurant Brands Asia Share Price

Restaurant Brands Asia Share Price | ‘रेस्टॉरंट ब्रँड एशिया’ या ‘बर्गर किंग रेस्टॉरंट’ चालवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी रेस्टॉरंट बँड एशिया कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 128.45 रुपये किमतीवर पोहोचले होते. रेस्टॉरंट ब्रँड्स एशिया कंपनीचे शेअर्स दिवसा अखेर 14 टक्क्यांच्या वाढीसह 122.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के घसरणीसह 120.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, खाजगी इक्विटी फर्म ‘एव्हरस्टोन कॅपिटल’ ने रेस्टॉरंट ब्रँड्स आशिया कंपनीचे 41 टक्के भाग भांडवल विकण्याची योजना आखली आहे. सिंगापूर स्थित एव्हरस्टोन कॅपिटल कंपनी ज्युबिलट फूडवर्स, पीई फर्म अॅडव्हेंट इंटरनॅशनल आणि जनरल अटलांटिक यांच्या कंसोर्टियमसोबत व्यवहार संबंधित वाटाघाटी सुरू केली आहे.

31 मार्च 2023 पर्यंतच्या शेअरहोल्डिंगचा डेटा नुसार, एव्हरस्टोन कॅपिटल फर्मने क्यूएसआर एशिया कंपनीच्या माध्यमातून रेस्टॉरंट ब्रँड एशिया कंपनीमध्ये 40.9 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या भाग भांडवलाचे एकूण मूल्य 21.68 अब्ज रुपये आहे.

रेस्टॉरंट ब्रँड्स एशिया कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाच महिन्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 137.75 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 83.71 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6053.35 कोटी रुपये आहे.

आर्थिक कामगिरी :
जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत ‘रेस्टॉरंट ब्रँड एशिया’ कंपनीला 73.37 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत ‘रेस्टॉरंट ब्रँड एशिया’ कंपनीला 67.07 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. त्याच वेळी मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 29 टक्के वाढीसह 514 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या कंपनीने मागील वर्षभरात अनेक नवीन रेस्टॉरंट्स लाँच केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Restaurant Brands Asia Share Price today on 19 May 2023.

हॅशटॅग्स

#Restaurant Brands Asia Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x