
Rites Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RITES लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.57 टक्क्यांच्या वाढीसह 491.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे.
मागील 6 महिन्यांत RITES लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 38 टक्के नफा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 357 रुपयेवरून वाढून 492 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
मागील एका वर्षात RITES लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 313 रुपयेवरून वाढून 492 रुपये किमतीवर पोहोचली होती. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी RITES लिमिटेड स्टॉक 2.07 टक्के घसरणीसह 479.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील 5 वर्षांत RITES लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के नफा कमवून दिला आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी RITES लिमिटेड कंपनीचे शेअर्स 165 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. RITES लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11083 कोटी रुपये आहे. RITES लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 584 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 303 रुपये होती.
RITES लिमिटेड कंपनीने सेबी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने केअर अॅडव्हायझरी रिसर्च अँड ट्रेनिंग लिमिटेड कंपनी एक करार केला आहे. RITES लिमिटेड कंपनी भारतात वाहतूक पायाभूत सुविधा सल्लागार आणि अभियांत्रिकी व्यवसायात एक अग्रेसर कंपनी मानली जाते. या कंपनीने केअर रेटिंग्स लिमिटेड कंपनीच्या उपकंपनीसोबत सल्लागार डोमेन आणि ईएसजी सेवांसाठी करार केला आहे.
या नवीन करारांतर्गत दोन्ही कंपन्या संयुक्तपणे ईएसजी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पीएसजी असेसमेंट, गॅप अॅनालिसिस, ईएसजी ड्यू डिलिजेन्स, ईएसजी पॉलिसी डेव्हलपमेंट आणि रोड मॅप या संबधित एकमेकांना सहकार्य करणार आहेत. RITES लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 5702 कोटी रुपये आहे. सध्या कंपनीकडे 300 कोटी रुपये पेक्षा जास्त मूल्याचे 70 विविध कामे प्रलंबित आहेत.
राइट्स लिमिटेड कंपनीने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची मदत घेऊन नवीन व्यवसाय संधी शोधण्यासाठी IIT रुरकीच्या i-Hub सोबत करार केला होता. या करारांतर्गत, RITES आणि I Hub प्रकल्प, कार्यक्रम आणि नेटवर्क सुविधेवर संयुक्त उपक्रमांवर काम करणार आहेत. यासह सायबर आणि भौतिक प्रणालीशी संबंधित नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर देखील संशोधन करण्याचे काम केले जाणार आहे.
RITES लिमिटेड कंपनी उद्योगाच्या गरजेनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विविध प्रयोग आणि शोध लावण्याचे काम देखील करत आहे. या दोन्ही एकत्र आलेल्या संस्था रोलिंग स्टॉक देखभाल, तपासणी, पुलाची देखभाल, कार्यालय व्यवस्थापन आणि विमानतळ इत्यादी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर करण्याच्या शक्यताबद्दल नवनवीन विकास काम करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























