19 November 2024 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Royal Orchid Hotels Share Price | या कंपनीचे शेअर्स तेजीत, शेअरची कामगिरी आणि टार्गेट प्राईस पहा

Royal Orchid Hotels Share Price

Royal Orchid Hotels Share Price | ‘रॉयल ऑर्किड हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. काही तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 90 टक्के पेक्षा जास्त वाढू शकतो. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.17 टक्के वाढीसह 276.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘नुवामा वेल्थ’ या ब्रोकरेज फर्मने स्टॉकसाठी 400 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ‘रॉयल आर्किड’ पुढील काळात मोठी रॅली अपेक्षित आहे. बोकरेज फर्मने या कंपनीच्या स्टॉकवर जारी केलेल्या अहवालात सर्व ट्रिगर प्राइज जाहीर केले आहेत. (Royal Orchid Hotels Limited)

गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका वर्षात ‘रॉयल ऑर्किड हॉटेल्स’ कंपनीच्या शारस आपल्या गुंतवणूकदारांना 123.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 21.48 टक्के वाढले आहेत, तर गेल्या पाच दिवसात या शेअरची किंमत 14.62 टक्के मजबूत झाली आहे. काल एका दिवसात हा स्टॉक 14.17 टक्के वाढला होता.

नुवामा वेल्थ फर्मने ‘रॉयल ऑर्किड हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 433 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार ही कंपनी या क्षेत्रातील इतर कंपन्यापेक्षा उत्तम कामगिरी करण्यास सक्षम आहे. सध्या हॉटेल रूम्सच्या सरासरी दराने कोविडपूर्व पातळी ओलांडली आहे. याचा फायदा कंपनीला पुढील काळात होईल असे तज्ञांना वाटते.

ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांच्या मते ‘रॉयल ऑर्किड हॉटेल्स’ कंपनीला असेंट लाइट मॉडेलचा मजबूत फायदा होणार आहे. नवीन आर्थिक वर्षात कंपनीने 2600 हॉटेल रूम्स जोडण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. त्यापैकी 2575 खोल्या व्यवस्थापन करारांतर्गत सामील केले जाणार आहे. ‘रॉयल ऑर्किड हॉटेल्स’ कंपनीकडे सध्या एकूण 4,805 रूम्स आहेत. त्यापैकी 3,640 व्यवस्थापनाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आहेत. ‘युनिव्हर्सल रिसॉर्ट्स’ या नावाने कंपनीने 1986 मध्ये हॉटेल सुरू केले होते. यात रॉयल ऑर्किड सेंट्रल, रॉयल ऑर्किड स्वीट्स, रॉयल ऑर्किड, असे अनेक ब्रँड सामील आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Royal Orchid Hotels Share Price on 30 March 2023.

हॅशटॅग्स

Royal Orchid Hotels Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x