16 April 2025 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Royal Orchid Hotels Share Price | होय! हा शेअर अल्पावधीत 67% टक्के देऊ शकतो, मागील एका वर्षात 134.33 टक्के परतावा दिला आहे

Highlights:

  • Royal Orchid Hotels Share Price
  • ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
  • गुंतवणूकीवर परतावा
  • कंपनीची आर्थिक स्थिती
Royal Orchid Hotels Share Price

Royal Orchid Hotels Share Price | रॉयल ऑर्किड हॉटेल्स कंपनीचे शेअर अशा काही शेअर्सपैकी एक आहे, ज्यानी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. रॉयल ऑर्किड हॉटेल्स कंपनीने नुकताच आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. तिमाही निकालानंतर या शेअरमध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते, असे तज्ञ म्हणतात.

ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एडेलवाइजने रॉयल ऑर्किड हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 595 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या बाजार भावापेक्षा 67 टक्के अधिक आहे. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 343.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गुंतवणूकीवर परतावा

गुरुवारी 1 जून रोजी रॉयल ऑर्किड हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 2.79 टक्के घसरणीसह 329 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या वर्षाच्या सुरुवातीपासून रॉयल ऑर्किड हॉटेल्स कंपनीच्या शेअर्समध्ये 25.88 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात तया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 134.33 टक्के परतावा दिला आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती

मार्च 2023 तिमाहीत रॉयल ऑर्किड हॉटेल्स कंपनीचे एकूण उत्पन्न मागील तिमाहीत 83 टक्क्यांनी वाढून 48.67 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. त्याच वेळी कंपनीचा ऑपरेटिंग नफा 95 टक्क्यांच्या वाढीसह 16.66 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील तिमाहीत कंपनीचा ऑपरेटींग नफा 8.51 कोटी रुपये नोंदवला गेला होता. रॉयल ऑर्किड हॉटेल्स कंपनीने मार्च तिमाहीत 158 टक्क्यांच्या वाढीसह 7.18 कोटी रुपये नफा कमावला आहे. जो मागील तिमाहीत कंपनीने 2.78 कोटी रुपये नफा कमावला होता.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2023 साठी एकत्रित आधारावर रॉयल ऑर्किड कंपनीचे एकूण उत्पन्न 79 टक्क्यांच्या वाढीसह 279.69 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीच्या निव्वळ नफ्यात 155.93 टक्के वाढ झाली होती. कंपनीचा ऑपरेटिंग नफा म्हणजेच EBIDTA मागील आर्थिक वर्षात 40.35 कोटींवरून वाढून 98.03 कोटी रुपयेवर गेला आहे. FY 2023 Q4 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 83 टक्क्यांच्या वाढीसह 49.22 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Royal Orchid Hotels Share Price today on 03 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Royal Orchid Hotels Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या