15 January 2025 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

RR Kabel IPO | आरआर काबेल कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, प्रोफीटेबल कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणार?

RR Kabel IPO

RR Kabel IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्या साठी एक खुश खबर आहे. TPG कॅपिटल-समर्थित वायर केबल निर्माता कंपनी ‘आरआर Kabel’ कंपनीने IPO च्या माध्यमातून भांडवल उभारण्यासाठी SEBI कडे प्राथमिक कागदपत्रे सादर केले आहेत. कागदपत्रांनुसार या IPO अंतर्गत ‘आरआर काबेल’ ही कंपनी 225 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.

याव्यतिरिक्त कंपनीचे प्रवर्तक आणि शेअर धारक 1.72 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहेत. OFS अंतर्गत कंपनीचे मोठे शेअर धारक महेंद्रकुमार रामेश्वरलाल काबरा, हेमंत महेंद्रकुमार काबरा, सुमीत महेंद्रकुमार काबरा, काबेल बिल्डकॉन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राम रतन वायर्स आपले शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत.

TPG कॅपिटलची 21 टक्के गुंतवणूक :
यूएस प्रायव्हेट इक्विटी फर्म ‘TPG कॅपिटल’ कंपनी देखील OFS अंतर्गत आपले शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. TPG कॅपिटल कंपनीने RR काबेल कंपनीचे 21 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. ही कंपनी फ्रेश शेअर्सच्या माध्यमातून जमा होणारी 170 कोटी रुपये रक्कम बँका आणि वित्तीय संस्थांच्या कर्जाची अंशतः किंवा पूर्ण कर्ज परतफेड करण्यासाठी वापरणार आहे.

आरआर ग्लोबल ग्रुप कंपनीच्या आरआर काबेल कंपनीने 2021-22 या आर्थिक वर्षात 214 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. याकाळात कंपनीने 4,386 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तीन तिमाहीत कंपनीने 125 कोटी रुपये निव्वळ निव्वळ नफा कमावला होता. आणि 4,083 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RR Kabel IPO is ready to launch soon check details on 09 May 2023.

हॅशटॅग्स

RR Kabel IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x