23 February 2025 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला पूर्व मध्य रेल्वेकडून नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने हा शेअर फोकसमध्ये (SGX Nifty) आला आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधा बळकट होण्यास आणि गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होईल असं आरव्हीएनएल’ने (Gift Nifty Live) म्हटलं आहे. मागील १० दिवसांत आरव्हीएनएल कंपनीला मिळालेला हा तिसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. यापूर्वी आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे आणि पीएसपीसीएल’कडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

कंपनीला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टचा तपशील

आरव्हीएनएल’ने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला पूर्व मध्य रेल्वेकडून वर्क-ऑर्डर प्राप्त झाली आहे. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीला मिळालेला हा कॉन्ट्रॅक्ट धनबाद विभागातील गोमोह पत्रातु विभागात इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टम अपग्रेड करण्यासाठी ट्रॅक्शन उपकेंद्रांचे डिझाइन, पुरवठा, बांधकाम, कार्यान्वित आणि चाचणी करण्याशी संबंधित आहे. या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत 186.77 कोटी रुपये असून ती 540 दिवसांत पूर्ण होणार आहे.

कंपनीला मिळालेले इतर कॉन्ट्रॅक्ट

रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड’कडून पंजाबच्या सेंट्रल झोनमधील पॅकेज-3 साठी वितरण पायाभूत सुविधांसंबंधित कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत 642.56 कोटी रुपये आहे. आरव्हीएनएल कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट 24 महिन्यांत पूर्ण करावा लागणार आहे. तसेच, 26 नोव्हेंबर 2024 रोजी आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून 625 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे.

कंपनीच्या शेअर्सची कामगिरी

बुधवार 04 डिसेंबर 2024 रोजी आरव्हीएनएल शेअर 1.40 टक्के वाढून 443.90 रुपयांवर पोहोचला होता. आरव्हीएनएल कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 647 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांक स्तर 165.60 रुपये होता. आरव्हीएनएल कंपनीचे एकूण मार्केट कॅप 92,617 कोटी रुपये आहे.

कंपनीचे तिमाही निकाल

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफ्यात 27.24 टक्के वार्षिक घट झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा नफा 286.88 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 394.26 कोटी होता. तसेच आरव्हीएनएल कंपनीच्या ऑपरेशन्समधील महसूल 1.21 टक्क्यांनी घसरून 4,854.95 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 4,914.32 कोटी रुपये होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 04 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x