23 December 2024 5:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (NSE: RVNL) झाला आहे. आरव्हीएनएल कंपनीने सोमवारी स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून २९४.९४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. सोमवारी RVNL कंपनी शेअरमध्ये किंचित घसरण झाली होती. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स

आरव्हीएनएल कंपनीला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार, या प्रोजेक्टअंतर्गत तेलंगणातील नवीपेट स्थानक ते इंदलवाई स्थानकापर्यंत दुहेरी ट्रॅकची बांधणी करायची आहे. या कॉन्ट्रॅक्टअंतर्गत सिग्नल आणि विद्युतीकरणाचे काम देखील आरव्हीएनएल कंपनीला करावे लागणार आहे. आरव्हीएनएल कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट २४ महिन्यांत पूर्ण करायचा आहे.

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘दुसऱ्या तिमाहीत कंपनीला २८६.९० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. वार्षिक आधारावर त्यामध्ये २७ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीला ३९४.३० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या महसुलातही वार्षिक आधारावर १.२ टक्क्यांनी घट झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा महसूल ४८५५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीचा महसूल ४९१४.३० कोटी रुपये होता.

शेअरने 457% परतावा दिला

मागील १ महिन्यात हा शेअर 6.32% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 22.90% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 81.80% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 457.86% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 37.80% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 18 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(158)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x