28 September 2024 5:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 1 ते 5 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर पोस्टाची TD योजना किती परतावा देईल, रक्कम नोट करा - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या - Marathi News Property Knowledge | तुमचं स्वतःचं घर या चुकीमुळे भाडेकरूचे होऊन जाईल, कायद्याची बाजू लक्षात ठेवा - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअरमध्ये 50% पूलबॅकचे संकेत, स्टॉक अजूनही ओव्हरव्हॅल्युएड, BUY करावा की Sell - Marathi News Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोच तिकिटावर AC कोचमधून प्रवास करू शकता - Marathi News Bank Account Alert | स्वतःच्या नव्हे तर पत्नीच्या नावावर करा FD सुरू, मिळतील आश्चर्यकारक फायदे - Marathi News Infosys Vs NTPC Share Price | इन्फोसिस आणि NTPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

RVNL Share Price | RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट, 5 वर्षात दिला 1926% परतावा - Marathi News

Highlights:

  • RVNL Share PriceNSE: RVNL – आरव्हीएनएल कंपनी अंश
  • कंपनीने केला मोठा करार
  • शेअरने 6 महिन्यांत दिला 106% परतावा – RVNL Share
  • शेअरने 5 वर्षात दिला 1926% परतावा – NSE:RVNL
RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स आज किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. रेल विकास निगम लिमिटेड (NSE: RVNL) कंपनीची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पुढील आठवड्यात 30 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करणारी एक नवरत्न दर्जा असलेली CPSE कंपनी आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

कंपनीने केला मोठा करार
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने SPV-Kinet Railway Solutions Ltd च्या निर्मितीसाठी रशियास्थित TMH अँड लोकोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स कंपनीसोबत करार केला आहे. नवीन स्थापन करण्यात आलेली SPV कंपनी वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट्सचे उत्पादन, पुरवठा आणि देखभाल संबंधित कामाची हाताळणी करणार आहे. यासह ही कंपनी 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याच्या कराराअंतर्गत भारतीय रेल्वेसाठी 120 ट्रेनसेट म्हणजेच 1920 वंदे भारत स्लीपर कोच पुरवणार आहे.

आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.87 टक्के वाढीसह 526.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 30 ऑगस्ट रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये AGM संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. आरव्हीएनएल स्टॉक BSE 200 इंडेक्सचा भाग आहे.

शेअरने 6 महिन्यांत दिला 106% परतावा
मागील 1 आणि 2 आठवड्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरची किंमत अनुक्रमे 2.22 टक्के आणि 7.21 टक्क्यांनी घसरली होती. मागील 3 आणि 6 महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत अनुक्रमे 26.84 टक्के आणि 106.87 टक्के वाढली होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 183.69 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअरने 5 वर्षात दिला 1926% परतावा
मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्ष या काळात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 204.33 टक्के, 1370.13 टक्के, 1619.63 टक्के आणि 1926.47 टक्क्यांनी वाढले आहेत. नुकताच आरव्हीएनएल कंपनीने 23 सप्टेंबर या रेकॉर्ड तारीखसह 2.11 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती.

मागील वर्षी या कंपनीने एप्रिलमध्ये 1.77 रुपये लाभांश वाटप केला होता. 2022 मध्ये मार्च आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना अनुक्रमे 1.58 रुपये आणि 0.25 रुपये लाभांश वाटप केला होता. आरव्हीएनएल कंपनीचे लाभांश उत्पन्न 0.41 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(117)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x